Vijai Sardesai: कला अकादमीच्‍या प्रकरणाला गावडेच जबाबदार; विजय सरदेसाई यांनी आरोपानंतर पुराव्याचा व्हिडीओ केला सादर

मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हाकला! विजय सरदेसाई यांची मागणी
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

Vijai Sardesai on Minister Govind Gaude: कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्‍याच्‍या प्रकाराला अकादमीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हेच जबाबदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही ते खोटे बोलत आहेत, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी आज व्हिडिओद्वारे पुरावा सादर केला.

त्यामुळे गावडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी सभागृहात लावून धरली आहे.

(Goa Assembly Session 2023)

Vijay Sardesai
Goa assembly monsoon session 2023 day 6: तुमको लडकी चाहिए क्या?... भर विधानसभेत आमदार वीरेश बोरकरांनी सांगितला 'तो' अनुभव...

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मागील सोमवारी 17 जुलै रोजी नूतनीकरण सुरू असलेल्या कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळले होते.

त्‍यानंतर कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी तात्काळ कोसळलेला भाग हा नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कला अकादमीचा भाग नव्हता तर तो 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता, त्यामुळे तो कोसळला असे जाहीर केले होते.

यावर आज आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी याच परिसरात फिरून मंत्री गावडे यांनी या संपूर्ण भागाचे कशा प्रकारे नूतनीकरण करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती दिली होती.

Vijay Sardesai
Bondla Sanctuary : बोंडला अभयारण्यात घालवा एक दिवस व एक रात्र; ‘जीटीडीसी’चा खास उपक्रम

नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कला अकादमीच्या मुख्य भागाबरोबर या भागाचेही नूतनीकरण सुरू असल्याचा व्हिडिओ सादर करत सरदेसाई यांनी मंत्री गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

जर ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्‍यांनी लावून धरली.

कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे खोटे बोलत आहेत हे आता व्हिडीओमुळे सिद्ध झाले आहे. हा केवळ कोट्यवधी रुपयांचा घोटाळा नाही तर हे एवढे मोठे प्रकरण खोटे बोलून झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकारच खोटारडे असून दिवसेंदिवस सत्य बाहेर येत आहे आणि आम्ही ते जनतेसमोर आणूच.

- विजय सरदेसाई,

गोवा फॉरवर्डचे आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com