Goa Agriculture : अडवई, नानेलीची ‘बागायत’ तहानलेलीच! बागायतदार त्रस्त

Goa Agriculture : पंप ऑपरेटर्सचा कामचुकारपणा; अधिकाऱ्यांकडे मांडली कैफियत
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture : वाळपई, सत्तरी तालुक्यात अडवई, वांते, नानेली भागातील बागायती पिके पाण्याविना सुकून गेली आहेत.

वाळपई भागातील इरिगेशन विभागाचे पंप ऑपरेटर्स व्यवस्थित, नियमित राहून लक्षपूर्वक काम करीत नसल्याने फेब्रुवारी महिन्याचा पंधरवडा संपत आला तरीही बागायतदार वर्गाला सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.

याच त्रासाला कंटाळून शुक्रवारी (ता.९) नानेली व अडवई, वांते भागातील बागायतदारांनी वाळपईतील इरिगेशन विभागीय कार्यालयात जाऊन साहाय्यक अभियंत्यांकडे पंप ऑपरेटर्सविरोधात कैफियत मांडली.

या अडवई भागात सकाळी ६ ते रात्री १० वा.पर्यंत बागायती पिकांच्या सिंचनासाठी बागायतदारांना पाणी सोडण्याचे वेळापत्रक वाळपई इरिगेशन विभागाने दिलेले आहे व अडवईत चार पंप ऑपरेटर्स कार्यरत आहेत. पण एकदा पंप सुरू केला की पुन्हा पंपाकडे लक्ष दिले जात नाही, अशी कैफियत बागायतदारांनी साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांच्याकडे मांडली.

साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांनी बागायतदारांना सांगितले की, नानेलीत दुसरा पंप बसविला जाईल व पंप ऑपरेटर्सना व्यवस्थित पाणी पुरविण्याची सूचना केली जाणार आहे.

तरीही पाण्यासाठी हाल!

अडवईचे माणिकराव राणे म्हणाले की, एकीकडे रानटी जनावरे त्रास करीत असतानाच आता पंप ऑपरेटर्स कामात कामचुकारपणा दाखवित असल्याने सिंचनाच्यावेळी बागायतींना वेळेत पाणी मिळत नाही.

त्यामुळे सुपारी पिके कोमेजत आहेत. अडवईत लिप्ट इरिगेशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था आहे. तरीदेखील ऑपरेटर्सच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.

वेळेत पाणीपुरवठा होत नाही!

१नानेलीचे विठ्ठल गावकर म्हणाले, दहा-पंधरा वर्षे लिप्ट इरिगेशनचे पाणी सिंचनासाठी वापरतो. यावर्षी पाणीपुरवठा वेळेत झालेला नाही. पहिले पाणी ६ फेब्रुवारीला आले. महिन्याला चार पाळ्या दिल्या पाहिजेत.

२ गौरेश गावकर म्हणाले, जानेवारीत ५ रोजी पाणी सोडले होते. पण अजूनपर्यंत आम्हाला पाणी व्यवस्थित मिळाले नाही. ऑपरेटर्सना विचारले तर ते कारणे सांगतात. पहिले तीन मोटर पंप होते. आता एकच आहे.

Goa Agriculture
Ro-Ro Ferryboat Goa: सहा-सात महिन्यांत रो-रो फेरीबोटी गोमन्तकीयांच्या सेवेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com