Goa AAP: गोव्यात 'आप'ला झटका; प्रतिमा कुतिन्‍होंचा पक्षाला रामराम

कार्यकारिणी उपाध्‍यक्षासह आपच्या प्राथमिक सदस्‍यपदाचा राजीनामा
Goa AAP
Goa AAPDainik Gomantak

Goa AAP: आम आदमी पक्षाच्‍या फायर ब्रॅण्ड नेत्‍या प्रतिमा कुतिन्‍हो यांनी बुधवारी आपल्‍या राज्‍य कार्यकारिणी उपाध्‍यक्ष पदाचा तसेच ‘आप’च्‍या प्राथमिक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला.

‘आप’ने नवीन राज्‍य कार्यकारिणी घोषित केल्‍यानंतर अवघ्‍या एकाच दिवसात कुतिन्‍हो यांनी हा राजीनामा सादर केल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जाते. शिवाय हा ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

नवीन कार्यकारिणीत कुतिन्‍हो यांची नियुक्‍ती उपाध्‍यक्षपदी केली होती. मी राजीनाम्‍याची प्रत ई-मेलद्वारे ‘आप’चे केंद्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना पाठविली आहे.

तसेच माझा निर्णय राज्‍य कार्यकारिणी अध्‍यक्ष अमित पालेकर यांनाही कळविला आहे, असे कुतिन्‍हो यांनी सांगितले.

मी हा निर्णय वैयक्तिक तसेच स्‍वत:च्‍या उत्‍कर्षासाठी तो घेतला असल्‍याचे कुतिन्‍हो यांनी सांगितले. दहा महिन्‍यांपूर्वी आम आदमी पक्षाने गोव्‍याची सर्व राज्‍य कार्यकारिणी बरखास्‍त केली होती. त्‍यावेळी कुतिन्‍हो यांचेही पद काढून घेतले होते.

मोकळ्‍या स्‍वभावाची कार्यकर्ती

यासंदर्भात कुतिन्‍हो यांच्‍याशी संपर्क साधला असता, गेल्या दहा महिन्‍यांपासून मी वैयक्‍तिक पातळीवर विविध विषयांना वाचा फोडण्‍याचे काम करत आहे. मी मोकळ्‍या स्‍वभावाची कार्यकर्ती आहे. कुठल्‍याही बंधनात राहून काम करणे आपल्‍याला पसंत नाही, यासाठीच मी या पदाचा राजीनामा दिला आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Goa AAP
Margao Railway News: रेल्‍वेला जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे किचन गलिच्‍छ, आस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com