Bhagavad Gita: गीतामृतम्! एकाचवेळी अडीच हजार विद्यार्थी करणार गीतेतील अध्यायांचे पठण

संस्कृत भारती गोवातर्फे "गीतामृतम्" या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Bhagavad Gita
Bhagavad GitaDainik Gomantak

Bhagavad Gita: संस्कृत भारती गोवातर्फे "गीतामृतम्" या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वा. डिचोली तालुक्यातील हायस्कूलमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थी एकाचवेळी भगवद गीतेतील बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण करणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा साखळीतील नगरपालिका मैदानावर होणार असल्याची माहिती साखळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Bhagavad Gita
Goa Live Updates 01 December: आधी रडले आता मागितली माफी! आरजीचे प्रमुख मनोज परब पोस्ट करत म्हणाले...

यावेळी संस्कृत भारती मंत्री गोवा प्रसाद उमर्ये, महाव्यवस्थापक गणेश जोशी व संयोजिका सुखदा पित्रे यांची उपस्थिती होती.

सकाळी 9.15 वा. सुरू होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, रिवण येथील श्रीविद्यापाठशालाच्या आचार्य अपर्णा देवदत्त पाटील, साखळीतील कार्यकर्ते संस्कृत भारतीचे अध्यक्ष आनंद देसाई, राजभाषा संचालनालयाचे उपसंचालक अनिल सावंत, स्वागताध्यक्ष शिवानंद खेडेकर व इतरांची उपस्थिती लाभणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com