Hankhane News : अवांतर वाचनाची सवय लावून घ्या! डॉ. सुशांत तांडेल

Hankhane News : हणखणेतील सरकारी विद्यालयाचे स्नेहसंमेलन
Government High School, Hankhane
Government High School, HankhaneDainik Gomantak
Published on
Updated on

Hankhane News : हरमल, बलवान आणि सक्षम समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने शिक्षण संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी अवांतर वाचनाची मुलांनी सवय लावून घ्यावी, असे प्रतिपादन सरकारच्या पणजीतील मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेटर डॉ. सुशांत तांडेल यांनी केले.

हणखणे शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळ्यात तांडेल बोलत होते. यावेळी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आलेल्या किशोर नाईक यास रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तसेच उत्कृष्ट विद्यार्थी आदित्य नीरपाल व रोशनी श्रीवंत, उत्कृष्ट क्रीडापटू गौरी नाईक व ओमकार ठाकूर व उत्कृष्ट खेळाडू मशाहीत अन्सारी यांना गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.

Government High School, Hankhane
Goa News: सरकारने प्रथम वाळपई तील मालमत्ता प्रकरणे सोडवावीत | Gomantak Tv

यावेळी सरपंच अशोक धावसकर, उपसरपंच कृष्ण हरिजन, पंच वामन नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी घाटवळ, मुख्याध्यापक नरेंद्र नाईक, ज्येष्ठ शिक्षिका बार्बरा कुटो आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक नरेंद्र नाईक यांनी अहवाल सादर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com