Agonda News : अप्याकोंड, गावडोंगरी बंधाऱ्याचे काम महिन्याभरात : रमेश तवडकर

Agonda News : एकूण ७५ कोटींचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. या भागात केंद्र सरकारच्या निधीचा वापर करून रस्ते, भूमिगत वीजवाहिन्या व अन्य विकासकामे केली जाणार आहे.
Agonda
Agonda Dainik Gomantak

Agonda News :

आगोंद, अप्याकोंड, गावडोंगरी बंधाऱ्याचे काम महिन्याभरात पूर्ण करणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. अप्याकोंड, गावडोंगरी, काणकोण येथे गुरुवारी (ता.२९) ओपन टाईप बंधाऱ्याची पायाभरणी तवडकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

तवडकर म्हणाले, की केंद्र सरकारच्या ट्रायबल कल्याण खात्यातर्फे आर्टिकल २७५ अंतर्गत खोतीगाव पंचायत क्षेत्रातील आवळी रस्ता व गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील अप्याकोंड येथील हा बंधारा ही दोन्ही कामे होत आहेत.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर सरकारच्या काळात या भागात अनेक बंधारे बांधण्यात आले होते. एकूण ७५ कोटींचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. या भागात केंद्र सरकारच्या निधीचा वापर करून रस्ते, भूमिगत वीजवाहिन्या व अन्य विकासकामे केली जाणार आहे.

Agonda
Goa Loksabha: गोव्यात लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार कोण? गूढ कायम, उत्कंठा वाढली

यावेळी जि.प. सदस्य शोभना वेळीप, सरपंच धिल्लन उर्फ़ यशवंत देसाई, पंचसदस्य प्रभाकर गावकर, अशोक गावकर, विनीता गावकर, सरिता वेळीप, सलोनी गावकर, देवस्थान समिती पदाधिकारी, जलसिंचन खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते. अधिकारी पाटील यांनी याच मार्च महिन्यात बंधा-याचे काम पूर्ण होईल. शेतक-यांनी याच फायदा घेऊन उत्पन्न वाढवावे, असे सांगितले.

दरम्यान, गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील कर्मणगाळ, बामणबुडो व बामणगाळ या ठिकाणी जलस्रोत खात्याअंतर्गत लघु बंधारे व गाळ ऊपसा करण्याची मागणी यावेळी सरपंच धिल्लन ऊर्फ यशवंत देसाई यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com