Ganesh Chaturthi 2023: गावपण टिकू दे, बाप्पाला साकडे; मोरजीत युवक एकत्र

पर्यावरण हानी रोखण्यासाठी घालणार गाऱ्हाणे
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Ganesh Chaturthi 2023: मोरजी गावातील जागृत युवकांनी एकत्रित येऊन मोरजी गाव सुरक्षित रहावे, गावचे गावपण टिकून रहावे यासाठी आणि मोठमोठ्या प्रकल्पांतून होणारे प्रदूषण, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी चतुर्थीच्या सहाव्या दिवशी मोरजी गणेशाला गाऱ्हाणे घालून गावात जनजागृती करण्याचा निर्धार केला.

17 रोजी कट्टेवाडा मोरजी येथील श्री ब्राह्मण देवस्थान परिसरात झालेल्या युवकांच्या बैठकीत निर्धार करण्यात आला.

बैठकीनंतर ॲड. प्रमोद शेट गावकर यांनी सांगितले,की आज गावपण नष्ट होत असताना दुःख वाटते. आज आम्ही पुढाकार घेऊन गाव वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्यासाठी काम करणार नाही आम्ही दुसऱ्यासाठी काम करत आहोत.

Ganesh Chaturthi 2023
चवथीची परबीं! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून गोमन्तकीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

त्यासाठी आता सर्व युवकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन गाव वाचवण्यासाठी संघटित होऊया. दि.२४ रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाला गाऱ्हाणे घालून जनजागृती करण्यात येणार आहे.

मयूर शेटगावकर यांनी सांगितले की, मोरजी भागात सध्या मोठमोठे प्रकल्प डोंगर माळरानावर आले असून त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.

"किनारे नष्ट होताना दिसत आहेत. डोंगर माळरानावरील डोंगर झाडे नष्ट केली जातात. डोंगरावरील झाडे कापल्यानंतर पशू,पक्षी जाणार कुठे ? गावातील शेतीही नष्ट होईल. याबाबत गावकऱ्यांनी उठाव करण्याची गरज आहे. किनारी भागात चाललेली मोठमोठे बांधकाम प्रकल्प डोंगर माळरानावर चाललेले बेकायदेशीर प्रकल्प हे गावपण नष्ट करण्यासाठी एक षडयंत्रच आहे."

- मयूर शेटगावकर, मोरजी

"किनारी भागात चाललेले प्रदूषण किनाऱ्यावर बिगर गोमंतिकीयांचे असलेले लक्ष त्यात पारंपरिक पायवाटा बंद होणे. मोठ-मोठे प्रकल्प येतात.या प्रकल्पाला थारा न देता आता मोरजीवासीयांनी उठाव करण्याची गरज आहे. देव देवतांनी दिलेली जमीन ती सुरक्षित आता आम्हाला ठेवावी लागेल, मच्छिमार बांधवांच्या जमिनी मच्छिमार बांधवांना मिळायला हव्यात."

-अल्बर्ट फर्नांडिस, मोरजी

"मोरजी भागातील काही सुशिक्षित युवक जागृत युवकांनी पुढाकार घेऊन मोरजी गावचं अस्तित्व राखण्यासाठी जे पाऊल टाकलेले आहे. त्यासाठी मांद्रे स्वराज्य संस्थेमार्फत आम्ही पाठिंबा देत आहोत. आणि गावच्या हितासाठी सदोदित प्रयत्न करणार असल्याचे सांगून मयूर शेट गावकर यांनी गावासाठी ज्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे.त्याला सर्व मोरजीवासीयांनी पाठिंबा देण्याची गरज आहे."

-ॲड. प्रसाद शहापूरकर

Ganesh Chaturthi 2023
Goa News: सदनिका खरेदीदारांना 8 टक्के कराचा भुर्दंड; अध्यादेश जारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com