Diwali 2023 : दामोदर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आकाशकंदिलांचे मोफत वितरण

Diwali 2023 : हे आकाशकंदील मोफत दामोदर विद्याप्रसारक संस्थेचे देणगीदार तसेच हितचिंतकांना यांच्या घरोघरी जाऊन देण्यात आले.
Diwali 2023
Diwali 2023 Dainik Gomanatk

Diwali 2023 : काणकोण, लोलयेतील दामोदर विद्यालयातर्फे इकोफ्रेंडली आकाशकंदिलांचे वितरण नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने ७० पर्यावरणपूरक आकाशकंदिलांची निर्मिती केली होती.

हे आकाशकंदील मोफत दामोदर विद्याप्रसारक संस्थेचे देणगीदार तसेच हितचिंतकांना यांच्या घरोघरी जाऊन देण्यात आले.

प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर करून बनविलेले आकाशकंदील पर्यावरणाला मारक ठरतात, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे, असे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर यांनी सांगितले.

Diwali 2023
Goa Students: गोव्यातील 4 शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोर्तुगालला जायची संधी; क्विझ काँटेस्टचे आयोजन

विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे आकाशकंदील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, राज्य आदिवासी कल्याण संचालनालयाचे संचालक दशरथ रेडकर, शिक्षण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. शंभू एस. घाडी, ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले तसेच सामाजिक आरोग्य केंद्र, पोलिस स्थानक, भागशिक्षण अधिकारी, ग्रामपंचायत आदींना आकाशकंदिलांचे वितरण करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com