सरकारी काम अन् बारा महिने थांब! तब्बल 45 वर्षांपासून कावरे पिर्ला येथील कुटुंब अंधारात, सरदेसाई सरकारवर कडाडले

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सरकार ‘सबका साथ सबका विकास’ म्हणते मग या कुटुंबाला अंधारात का ठेवते, असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी उपस्थित केला
सरकारी काम अन् बारा महिने थांब! तब्बल 45 वर्षांपासून कावरे पिर्ला येथील कुटुंब अंधारात, सरदेसाई सरकारवर कडाडले
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

४५ वर्षांपासून कावरे पिर्ला येथे एक कुटुंब अंधारात आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी वीज जोड घेण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना १५ खांबांसाठी ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी २०१६ मध्ये ते पैसे भरले. त्यानंतर त्यांनाच ट्रॅक्टर आणून खांब घाला, असे सांगण्यात आले. ते त्यांना शक्य न झाल्याने आजवर ते अंधारात राहिलेले आहेत.

सरकार ‘सबका साथ सबका विकास’ म्हणते तर मग या कुटुंबाला अंधारात का ठेवते, असा प्रश्‍न शून्य तासाला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. त्यावर कावरे-पिर्ला येथील एका कुटुंबाला उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज जोड देतो, असे आश्वासन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत दिले. त्या कुटुंबाला वीज जोड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर कारवाईही करू, असेही त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com