प्रसिद्ध न्यायवैद्यक डॉ.मधुकर उसगावकर यांचे गोमेकॉत निधन

पोर्तुगीज काळातील असोल्डा येथील प्रसिद्ध डॉक्टर कै. शिवराम उसगावकर यांचे सुपुत्र होते.
Goa GMC
Goa GMCDainik Gomantak

पणजी: गोव्यातील गोमेकॉ इस्पितळ (Goa Medical Hospital) तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) मिळून पाच दशके प्रसिद्ध न्यायवैद्यक डॉक्टर म्हणून नावलौकिक असलेले डॉ. मधुकर शेणवी उसगावकर यांचे सोमवारी, 21 फेब्रुवारी रोजी रात्री गोमेकॉ (GMC) इस्पितळात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सांतिनेझ, पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Goa GMC
Russia-Ukraine Crisis: संभाव्य युद्धाचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम शक्य

गोमेकॉ इस्पितळात उसगावकर हे 1962 ते 1994 अशी 33 वर्षे तर कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड (महाराष्ट्र) येथे फॉरेन्सिक विभाग प्रमुख म्हणून वीस वर्षे सेवा दिली. ते पोर्तुगीज काळातील असोल्डा येथील प्रसिद्ध डॉक्टर कै. शिवराम उसगावकर यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी माणिक, पुत्र सुश्रुत, कन्या प्रतिभा असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com