Mopa Airport: मोपा’च्या विस्तारीकरणाला प्रारंभ

Mopa Airport: प्रवासी क्षमता होणार दुप्पट: दररोज 135 विमानांचे लक्ष्य
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

Mopa Airport:

पणजी गेल्या जानेवारीत वर्ष पूर्ण झालेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला आता सुरवात झाली आहे. सध्या या विमानतळावर दररोज १०० विमाने ये-जा करतात आणि त्यातून दहा हजार प्रवाशांची ये-जा असते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन महिन्यांत या विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे. दररोज 135 विमानांची ये - जा आणि 21 हजार प्रवाशांची ये-जा असे लक्ष्य विस्तारीकरणानंतर ठेवण्यात आले आहे.

मोपाच्या पठारावर 2 हजार 132 एकरावर पसरलेल्या या विमानतळाची चार दशलक्ष प्रवासी दरवर्षी हाताळण्याची क्षमता आहे. ती आता दुप्पट करून आठ दशलक्ष प्रवासी हातळण्याइतपत करण्यात येणार आहे.

Mopa Airport
RTI Portal: आरटीआय पोर्टलचे शानदार लोकार्पण

यासाठी येत्या दोन महिन्यांमध्ये प्रवाशांची ये-जा करण्यासाठी असलेल्या सुविधांत वाढ केली जाणार आहे. सध्या या विमानतळावर विमानात चढ - उतार करण्याची पाच ठिकाणी सोय आहे. त्यात येत्या जूनपर्यंत वाढ करून सात ठिकाणी प्रवासी विमानात उतरू चढू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

या विमानतळावरून सध्या लंडन, मँचेस्टर, अबुधाबी आणि मस्कत अशा विदेशातील केवळ चार ठिकाणीच विमान सेवा आहे. त्यातही आता वाढ केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com