Mapusa News: ‘मोदी सरकार नव्हे, भारत सरकारच लिहावे’; युनायटेड सिटीझन ऑफ गोवाची मागणी

भारतीय संविधनानुसार भारत सरकार असेच कायद्याने संबोधिले किंवा लिहिले जाऊ शकते. इतर कुणाच्या नावाने किंवा मोदी सरकार असा उच्चार व प्रसिद्धी करणे हा संविधानाचा अपमान तसेच कायद्याचे उल्लंघन ठरते
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

Mapusa News

म्हापसा येथील प्रशासकीय कार्यालयाबाहेर मोदी सरकार अशी बॅनरे लावली आहेत. मुळात भारतीय संविधनानुसार भारत सरकार असेच कायद्याने संबोधिले किंवा लिहिले जाऊ शकते. इतर कुणाच्या नावाने किंवा मोदी सरकार असा उच्चार व प्रसिद्धी करणे हा संविधानाचा अपमान तसेच कायद्याचे उल्लंघन ठरते, असा दावा करीत सदर कार्यालयाबाहेरील मोदी सरकार हे बॅनर्स हटवावे, अशी मागणी युनायटेड सिटीझन ऑफ गोवा यांनी केली. यासंदर्भात या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (ता.१२) बार्देश उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

यावेळी बोलताना संजय बर्डे म्हणाले की, संविधानात फक्त भारत सरकार असेच म्हणता येते. परंतु, म्हापशातील प्रशासकीय कार्यालयाबाहेर मोदी सरकार म्हणून बॅनरे लावली आहेत. जे योग्य नसून, वैयक्तिकदृष्ट्या एका ठराविक व्यक्तीची प्रसिद्धी केली जात आहे. गोवा सरकारने हे बॅनर्स ताबडतोब हटवावेत.

शंकर पोळजी म्हणाले की, मोदी सरकार म्हणून बॅनर्स लावण्याचा अधिकार कुणी दिला? एकप्रकारे फक्त बॅनर्स उभारुन परिसर गलिच्छ तसेच प्रदूषण केले जात आहे. एका ठराविक व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी करदत्यांच्या पैशांचा चुराडा करणे बरोबर नाही.

मुळात पंतप्रधान मोदींवर देशाच्या सुरक्षतेची जबाबदारी आहे. अशाप्रकारे त्यांनी स्वतःची प्रसिद्धी करु नये. त्यामुळे मोदी सरकार म्हणून लावलेले बॅनर्स हटवून तिथे भारत सरकार असाच उल्लेख करावा अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी जनार्दन ताम्हणकर, सितेश मोरे, अनिल केरकर, दिपेश नाईक आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com