Margao Parking: मडगाव पार्किंग प्रकल्पाचा अंदाजे खर्च 6.5 कोटी रुपये

मडगाव येथील पार्किंग प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे.
pay and park
pay and park Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव येथील पार्किंग प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. सुरवातीला या प्रकल्प बांधणीसाठी 5.5 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. पण आता नव्या अंदाजपत्रकाप्रमाणे 6.5 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(Estimated cost of Margaon parking project is Rs.6.5 crore)

pay and park
Goa Feast: फेस्त फेरी स्थगितीचा आदेश देण्याची मागणी

सध्या गोवा राज्य नगर विकास मंडळाने (सुडा) हा प्रकल्प बांधण्यावर प्राथमिक स्तरावर पावले उचलण्यास सुरवात केली असून माती चाचणीसाठी निविदा जाहीर केली आहे. मातीचा चाचणी अहवाल आल्यावर प्रकल्प बांधणीसाठी निविदा जाहीर केल्या जातील. मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो या प्रकल्प उभारणीवर लक्ष ठेवून आहेत.

2011-12 साली राज्य सरकारने या पार्किंग प्रकल्पासाठी 3 कोटी रुपये नगरपालिकेला मंजूर केले होते. यापूर्वी नगरपालिकेने या प्रकल्पासाठी कित्येकदा निविदा जाहीर केल्या होत्या. पण कोणीही कंत्राटदार पुढे आला नाही. आता बांधकाम साधने व वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे खर्च वाढणे साहजिकच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com