Eid al-Fitr 2024 : मुख्यमंत्र्यांकडून मुस्लिम बांधवांना ‘ईद मुबारक’

Eid al-Fitr 2024 : नगरसेवक रियाझ खान यांच्या घरी दिली भेट
Goa Cm Pramod Sawant
Goa Cm Pramod Sawant Dainik Gomatnak

Eid al-Fitr 2024 :

साखळी, ईद उल फित्र सणानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील नगरसेवक रियाझ खान यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोव्यातील मुसलमान धर्मियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी साखळीतील मुसलमान बांधवांची उपस्थिती होती. गोवा हे सर्व धर्म समभाव राखणारे राज्य असून या राज्यात सर्व धर्मीय सलोख्याने राहतात.

असा सलोखा इतर राज्यात पहायला मिळणे कठीण आहे. गोव्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मिय एकमेकांच्या सणांना भेटी देऊन शुभेच्छा देतात,असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले.

Goa Cm Pramod Sawant
NSG Goa Blast Investigation: गोव्यातील स्फोटाचा एनएसजी तपास करणार, अधिकारी घटनास्थळी

साखळीत धार्मिक सलोखा !०

नगरसेवक रियाझ खान यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. साखळीतील सर्व धर्मीय लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात.

प्रत्येक धर्मातील लोक इतरांच्या सणांना त्यांच्या घरी उपस्थिती लावतात, व शुभेच्छा देतात. म्हणूनच साखळीतील धार्मिक सलोखा आजही अबाधित आहे, असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com