Dr. Ramani Goa Marathon 2023 : जगप्रसिद्ध रामाणी मॅरेथॉन यंदा 5 नोव्हेंबरला!

दोन हजार स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित : बांदोड्यात भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आयोजन
Dr. Ramani Goa Marathon 2023
Dr. Ramani Goa Marathon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda : जगप्रसिद्ध ‘डॉ. रामाणी गोवा मॅरेथॉन डीआरजीएम २०२३’ यंदा येत्या ५ नोव्हेंबरला फोंड्यात होणार आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या ठरलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत गोवा तसेच देशभरातील धावपटू आणि विशेषतः परदेशातील धावपटूही सहभागी होत असल्याने एकापरीने या मॅरेथॉनला जगमान्यता मिळाली आहे.

या मॅरेथॉनसंबंधीची माहिती डॉ. पी. एस. रामाणी यांनी फोंड्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयोजक समितीचे राजेश शेणवी तसेच प्रकाश केंकरे व इतर उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेच्या जर्सीचे यावेळी अनावरण करण्यात आले.

ही स्पर्धा बांदोडा - फोंड्यातील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू होणार आहे. विविध वयांच्या गटवारीनुसार ठराविक किलोमीटरनुसार ही स्पर्धा आयोजित केली जाते. विशेष म्हणजे पंचाऐशी वयोमान असलेले डॉ. पी. एस. रामाणी यंदाही या मॅरेथॉनमध्ये भाग घेणार आहेत.

युवा तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून कुर्टी - फोंड्यातील क्रीडा संकुलात तसेच तळावली येथील रामाणी मैदानावर हे प्रशिक्षण तज्ज्ञांमार्फत दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाला असून प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. सहभागी विविध गटांना शुल्कात सूट देण्यात येत असून यंदा किमान दोन हजार मॅरेथॉनपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा डॉ. पी. एस. रामाणी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पुढील काळात पोर्तुगीज भाषेच्या तज्ज्ञांची एक परिषद गोव्यात आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती डॉ. पी. एस. रामाणी यांनी दिली.

Dr. Ramani Goa Marathon 2023
Ponda News - बोरीच्या सिध्दनाथ मंदिरात चोरीचे प्रकार सुरुच | Gomantak TV

महिलांनाही विशेष स्थान!

दरवर्षी फोंड्यात रामाणी मॅरेथॉन भव्य प्रमाणात होते. गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेत साठ व त्यावरील वयोगटातील ज्येष्ठांना सहभागी करून घेतले जात आहे. त्यात पुरुष व महिलांचाही समावेश असतो.

ज्येष्ठांसाठी दोन ते पाच किलोमीटर अंतर निर्धारित केले जाते. महिला आपल्या आरोग्याकडे गंभीरपणे पाहात नाहीत, त्यामुळे या महिलांना सुदृढ आरोग्य मिळावे यासाठी विविध वयोगटातील महिलांनाही मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांबरोबरच महिलांनाही विशेष स्थान दिले जाणार असल्याचे डॉ. पी. एस. रामाणी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com