Diwali Padwa : सत्तरीत गुरांची पूजा उत्साहात

Diwali Padwa : तसेच गावांमध्ये शेणाचा वाडा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यांचीही पूजा करण्यात आली.
 Diwali Padwa
Diwali Padwa Dainik Gomantak

Diwali Padwa : वाळपई, दिवाळीत साजरा होणारा पाडवा सण सत्तरीत उत्साह साजरा करण्यात आला. अनेक गावांत गुरांची पूजा करण्यात गुरांच्या गळ्यात पुष्पहार घालून पोळे बांधून रीतसर पूजा करण्यात आली.

तसेच गावांमध्ये शेणाचा वाडा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यांचीही पूजा करण्यात आली.

नाणूस येथील अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रातील गो शाळेमध्ये गोपालन पूजा करण्यात आली. यावेळी खजिनदार लक्ष्मण जोशी यांनी विधीवत मंत्र म्हणून गोशाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी ही पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येनी गोप्रेमी उपस्थित होते. भाविकांतर्फे गाईंना गूळ व पोळी देण्यात आली.

 Diwali Padwa
Goa Culture: लोकोत्सवास देशव्यापी प्रतिसाद

यावेळी हनुमंत परब म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम प्रत्येकाचे आहे. यावेळी गोशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कल्पेश गावस, रूपेश राऊत, विजय नाईक आदींची उपस्थिती होती. कोपार्डे येथील पशू पैदास केंद्रातही पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी गो मातांचे पूजन केले.

रावण येथील आत्माराम गावस म्हणाले, पूर्वी आमची गुरे होती, पण आता गुरे नाहीत. तरीही गोठा करण्याची पारंपरिकता जपून ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com