Diwali Padwa : सत्तरी गोवर्धन पूजा उत्साहात

Diwali Padwa : सत्तरी तालुक्यात आज मंगळवारी विविध ठिकाणी दीपावली पाडवा म्हणजेच गोवर्धन पूजा करण्यात आली. ज्यांच्या घरात गायी, म्हशी आहेत. तेथे गोठा तयार केला होता.
Diwali Padwa Worship
Diwali Padwa Worship Dainik Gomantak

Diwali Padwa : वाळपई, सत्तरी तालुक्यात आज मंगळवारी विविध ठिकाणी दीपावली पाडवा म्हणजेच गोवर्धन पूजा करण्यात आली. ज्यांच्या घरात गायी, म्हशी आहेत. तेथे गोठा तयार केला होता.

गुरांची बांधण्याची जागा, खाद्य देण्याची जागा, पाणी पिण्याची जागा आदी गोष्टी या शेणाच्या गोठाघरात तयार केल्या होत्या. आज सकाळी गोठ्याची पूजा करण्यात आली. वाळपई नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात पाडवा साजरा केला.

Diwali Padwa Worship
Sattari News : ‘जैवसंवेदनशील’मुळे गावपण टिकेल

या गोशाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी आपल्या पिसूर्ले येथील निवास स्थानी गायींची मनोभावे पूजा केली. सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागातील लोकींनी गायींची पूजा केली. नगरगाव पंचायतीच्या सरपंच संध्या खाडिलकर व उद्योजक प्रसाद खाडिलकर यांनी ब्रम्हाकरमळी येथे आपल्या निवासस्थानी गाईंची पूजा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com