Sattari News : ‘जैवसंवेदनशील’मुळे गावपण टिकेल

सत्तरी जैवविविधतापूर्ण : संवर्धनाचे दायित्व; नागरिकांच्या योगदानाची गरज
Biodiversity
Biodiversity Dainik Gomantak

पद्माकर केळकर

Sattari News : वाळपई, सरकारने जर निश्‍चित केलेली गावे जैवसंवेदनशील म्हणून घोषित केली तर सत्तरी तालुक्यातील बरीचशा गावांतील जैवविविधता संवर्धित राहून गावच्या गावपणाला वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

सत्तरी तालुका जैवविविधतेने नटलेला आहे. या ‘जैवसंवेदशील’मुळे अनेक प्रदूषणकारी प्रकल्प हद्दपार होण्यास वाव मिळणार आहे. अन्य विकासकामांना मात्र कोणतीही बाधा पोहोचणार नाही.

त्यामुळे जैवसंवेदनशील गावे सत्तरी तालुक्याला वेगळी ओळख दाखविणारी प्रक्रिया ठरणारी आहे. या क्षेत्रात खनिज व्यवसाय, चिरेखाणी व्यवसाय, प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प या गोष्टींना लगाम बसणार आहे.

Biodiversity
Yahoo Most Searched 2021: सिद्धार्थ शुक्ला बनला सर्वाधिक सर्च केला जाणारा सेलिब्रिटी

सत्तरी तालुक्यात अनेक गावांतील वनक्षेत्राचे अस्तित्व असलेली स्थळे या प्रक्रियेमुळे सुरक्षित राहतील.

सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर म्हादईच्या परिसरात जैवसंपदेचा मोठा अधिवास आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्याला विशेष असे महत्त्व आहे. म्हादईच्या वनसंपदेत अनेक वनस्पती, पशुपक्षी दृष्टीस पडतात.

केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने भारत सरकारच्या राजपत्राद्वारे अधिसूचना जाहीर करीत इको सेन्सिटिव्ह झोनसाठी कार्यवाही याआधीच हाती घेतली आहे. त्यामुळे जैवसंपदांचे संवर्धन होण्यास मोठा वाव

मिळणार आहे.

निसर्गसंपन्न ठिकाणे

ब्रह्माकरमळी गावात आजोबाची तळी, ब्रह्मदेवाची तळी, गावठी औषधे मिळणारी ठिकाणे अशी निसर्गाच्या सान्निध्यातील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

तसेच साट्रे गावात पाषाणे, गड, नानोडा-बांबर येथे ‘यू’ आकाराची वनस्पती आढळतात. जैवसंवेदनशील यामुळे अशी ठिकाणे सुरक्षित राहणार आहेत. तसेच प्रदुषणमुक्त गाव राहण्यास मदत मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com