Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनानिमित्त 22 तारखेला सगळ्यात मोठी दिवाळी सत्तरीतच!

वाळपई येथील श्री हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirDainik Gomantak

येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनानिमित्त देशभर मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आज (14 जानेवारी) वाळपई येथील श्री हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Ayodhya Ram Mandir
Crime News : कामात अडथळाप्रकरणी माय-लेकीविरुद्ध गुन्हा

यावेळी वाळपई मंदिरात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी देखील साफसफाई केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, 22 तारखेला अयोध्येत राम मंदीर प्रतिष्ठापना होत आहे. यादिवशी सर्वांनी आपल्या घरी, मंदीरात दिवाळी साजरी करावी.

गोव्यात या दिवशी सगळ्यात मोठी दिवाळी सत्तरी आणि उसगावात साजरी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी आपले योगदान द्यावे. यावेळी राणे यांनी वाळपई शहरातील घराघरात फिरुन श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले.

त्यांच्यासोबत वाळपई नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, विनोद शिंदे, वाळपई हनुमान मंदिराचे अध्यक्ष भानुदास वेलिंगकर, कालिदास मणेरकर त्याच बरोबर इतरांची उपस्थिती होती.

पर्ये सत्तरी येथील श्री भूमिका मंदिरात आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्याहस्ते स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनादिनानिमित्त आपल्या गावातील मंदिराची साफ सफाई तसेच मंदिर सजावट करुन 22 रोजी दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशाने प्रथम मंदिराची साफ सफाई करण्यात आली.

यावेळी आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी मंदिर स्वत: मंदिर परिसरात स्वच्छता केली. यावेळी त्यांच्यासोबत विनोद शिंदे, तसेच पर्ये सरपंच रती गावकर व इतर पंच सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिकेचे वाटप करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com