Crime News : कामात अडथळाप्रकरणी माय-लेकीविरुद्ध गुन्हा

Crime News : त्यावेळी जेवणाची वेळ असूनही कर्मचाऱ्यांनी सदर मांजरावर उपचार केले व त्यांना उद्या बुधवारी घेऊन येण्याचा सल्ला दिला.
Crime
Crime Dainik Gomantak

Crime News : म्हापसा, आकय, म्हापसा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी माडेल-थिवी येथील एका माय-लेकी विरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

ही घटना १० रोजी दुपारी १.१२ च्या सुमारास घडली. संशयित महिला ९ रोजी दुपारच्या जेवणाच्याच वेळी रुग्णालयात मांजराला घेऊन त्याच्यावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी जेवणाची वेळ असूनही कर्मचाऱ्यांनी सदर मांजरावर उपचार केले व त्यांना उद्या बुधवारी घेऊन येण्याचा सल्ला दिला.

Crime
Goa Politics: हिंमत असेल तर बाबूशनी तत्काळ राजीनामा द्यावा!

त्यानंतर संशयित महिला १० रोजी दुपारीच रुग्णालयात मांजराला घेऊन आल्या. त्यावेळी कर्मचारी जेवण करत होते. त्यांनी संशयित माय-लेकीला जेवण करेपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी हा सल्ला फेटाळला व आमच्या मांजरावर आताच्या आताच उपचार करावेत, अशी मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com