Diwali 2023 : नानोड्यात ''दीपोत्सव'' उत्साहात; आरती थाली सजावट स्पर्धेत पलक गाड प्रथम

Diwali 2023 : महिलांसाठीच्या आरती थाली सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Diwali 2023
Diwali 2023 Dainik Gomantak

Diwali 2023 : डिचोली, नानोडा येथे आयोजित ''दीपोत्सव'' प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात भाविकांनी उत्साही प्रतिसाद दिला. महिलांसाठीच्या आरती थाली सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लाटंबार्से सम्राट क्लबच्या सहकार्याने नानोड्याच्या श्री शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतीक संघातर्फे श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण मंदिरात गुरुवारी (ता १६) या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित भाविकांनी दीप प्रज्वलीत करताच मंदिरात दिव्यांचा लखलखाट पसरला. या दीपोत्सवात महिलांसह मुलेही सहभागी झाली होती.

दीपोत्सव सोहळ्यास देवस्थानचे पुरोहित लक्ष्मण भुस्कुटे प्रमुख पाहूणे या नात्याने उपस्थित होते. अन्य मान्यवरात स्थानिक पंचसदस्य निलम कारापूरकर, अडवलपालचे पंचसदस्य गीतेश गडेकर, सम्राट क्लबचे अध्यक्ष तुळशीदास शिरोडकर,उपाध्यक्ष अवधूत नाईक, राज्य विस्तार संचालक शेखर नाईक, तुळशीदास बुगडे आदी उपस्थित होते.

भुस्कुटे यांनी दीपोत्सवाचे महत्व विषद केले. शेखर नाईक यांनीही आपले विचार मांडले. तुळशीदास शिरोडकर यांनी स्वागत केले.

Diwali 2023
Goa Politics: ‘तिसरा जिल्हा’ ही काँग्रेसची दूरदृष्टी: युरी आलेमाव

सजावट स्पर्धेत पलक गाड प्रथम

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरती थाली सजावट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पलक प्रसाद गाड हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

रुपाली रमाकांत गाड आणि गौरी अरविंद मळीक यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. निर्मला विठ्ठल आजगावकर आणि शर्मिला पुनाजी गाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद माळगावकर आणि निर्मला शिरगावकर यांनी काम पहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com