Diwali 2023 : दिव्यांच्या सणात अनिष्ट प्रवृत्ती नको! सुदिन ढवळीकर

Diwali 2023 : बांदोडा - फोंड्यात ‘दीपोत्सव-2023 ’ने दिली दिवाळीची अनुभूती
Diwali 2023
Diwali 2023 Dainik Gomantak

Diwali 2023 : फोंडा, दीपावली हा दिव्यांचा उत्सव आहे. वाईटावर चांगल्याने मात करण्याचा आणि जीवनात समृद्धता येणारा हा उत्सव असून या उत्सवात अनिष्ट प्रवृत्तींना थारा देऊ नका असे आवाहन मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

बांदोडा - फोंड्यातील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर काल दीपोत्सव २०२३ हा भव्य आगळावेगळा दिवाळी सणाची महती सांगणारा उत्सव लोकांच्या प्रचंड उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी सुदिन ढवळीकर बोलत होते.

माधवराव ढवळीकर ट्रस्ट व बांदोडा पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत युवा नेते मिथिल ढवळीकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, प्रिया च्यारी, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर,

उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य रामचंद्र नाईक, वामन नाईक, व्यंकटेश गावडे, मनिषा गावडे, मुक्ता नाईक, सोनिया नाईक, रेश्‍मा मुल्ला, मडकई सरपंच शैलेंद्र पणजीकर, कवळे सरपंच मनुजा नाईक, वाडी तळावली सरपंच वसुंधरा सावंत, कुंडई सरपंच सर्वेश जल्मी, दुर्भाट सरपंच चंदन नाईक, अभियंता सुदन कुंकळकर, आर्मस्ट्रॉंग फर्नांडिस, महानंद शेट व इतर मान्यवर उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, दिव्यांचा उत्सव साजरा करताना इतर अनिष्ट गोष्टींना थारा देता कामा नये. आपण नरकासुराला विरोध करताना श्रीकृष्ण पूजनाला प्राधान्य देतो, पण अजूनही काहीजण नरकासुराचा उदो उदो करतात.

हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असून दिवाळीच्या दिवशी सकाळी रस्त्यावर पडलेला नरकासुरांच्या सांगाड्यांचा खच, रात्रभर युवा पिढीचा धिंगाणा यामुळे दिवाळीचा मुख्य उद्देशच आपण हरवत चाललो आहोत काय, असा प्रश्‍न निर्माण होत असून आजच्या पिढीला आपण काय देणार आहोत, हे पालकांनीच ठरवावे, असे ढवळीकर म्हणाले.

जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक यांनीही दीपोत्सवाची परंपरा वीजमंत्र्यांनी सुरू ठेवल्याने एक चांगला उत्सव पहायला मिळतो, असे सांगितले. सरपंच सुखानंद कुर्पासकर यांनीही दीपोत्सव २०२३ हा आगळावेगळा उत्सव असल्याचे सांगून ढवळीकर यांच्याकडून एक चांगला उपक्रम सातत्याने आयोजित केला जातो, असे नमूद केले.

माजी सरपंच अजय नाईक दांपत्याने यजमानपद भूषवले. स्वागत व प्रास्ताविक माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन सोनिया नाईक तर रामचंद्र नाईक यांनी आभार मानले.

Diwali 2023
Diwali 2023 : नानोड्यात ''दीपोत्सव'' उत्साहात; आरती थाली सजावट स्पर्धेत पलक गाड प्रथम

लक्ष्मी-श्रीकृष्ण पूजन, धेंडलो मिरवणूक

बांदोडा येथील मैदानावर आयोजित या उत्सवात लक्ष्मी व श्रीकृष्ण पूजनासह धेंडलोची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक जतींसह ही मिरवणूक उत्साहात निघाली.

या उत्सवानिमित्त भाऊसाहेब बांदोडकर मैदान दिव्यांच्या आराशीने सुशोभित करण्यात आले होते. मैदानावर चारी बाजूने आकाशकंदील तसेच विजेची रोषणाई करण्यात आली होती.

विशेष म्हणजे दिवाळीच्या सणातील प्रमुख फराळअसलेल्या गावठी पोह्यांच्या पाच विविध पदार्थांचा आस्वादही उपस्थितांनी घेतला. या उत्सवाला लोकांची प्रचंड उपस्थिती लाभली. त्यानंतर दीप सप्तस्वर हा सुरेख सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com