Diwali 2023 : डिचोलीत 10 हजार पणत्या प्रज्वलित

Diwali 2023 : श्री शांतादुर्गा ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
Diwali 2023
Diwali 2023Dainik Gomantak

Diwali 2023 : डिचोली गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात सोमवारी (ता.१३) ‘दीपोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शांतादुर्गा ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या दीपोत्सवात ग्रामस्थ गावकर मंडळासह महिला मिळून शेकडो भाविकांनी सहभागी होत पणत्या प्रज्वलित केल्या. पणत्या पेटविल्यानंतर मंदिर परिसरात दिव्यांचा लखलखाट पसरला होता. फुलांची रांगोळी आणि पणत्यांची आकर्षक आरास सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

Diwali 2023
Goa Comunidade: ‘कोमुनिदाद’वरील घरांना विरोधच!

दीपोत्सवानिमित्त ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे यंदा दहा हजार पणत्या प्रज्वलित करून मंदिर परिसर प्रकाशमय करण्याचा संकल्प करण्यात आला होता. भाविकांनी या दीपोत्सवात सहभागी होऊन दीपप्रज्वलनाचा संकल्प यशस्वी केला. दीपोत्सव सोहळ्यात सहभागी सर्व भाविकांना देवस्थान समितीचे अध्यक्ष सतीश गावकर आणि पदाधिकाऱ्यांनी धन्यवादही दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com