Goa Politics: 'सिक्वेरांना मंत्री म्हणून अपात्र करा', अमित पाटकरांचे सभापतींकडे निवेदन

अपात्रता याचिकेचा निर्णय झाला नसल्याने पाटकर यांनी सिक्वेरांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Goa Congress | Amit Patkar
Goa Congress | Amit Patkar Dainik Gomantak

Goa Politics: सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेतल्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आलेक्स सिक्वेरा यांनी 19 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली.

वर्षभरानंतर मंत्रिपदाच्या आश्‍‍वासनाची पूर्तता अखेर भाजपने केली. पण, सिक्वेरा यांना मंत्री म्हणून अपात्र ठरवा असे, निवेदन अमित पाटकरांनी सभापतींकडे सादर केले आहे.

मागील वर्षी काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये सामिल झाले होते. त्यानंतर पक्षाच्या वतीने आठ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. या अपात्रता याचिकेचा निर्णय अद्याप बाकी असल्याने सिक्वेरा यांचे मंत्रिपद अपात्र करावे असे निवेदन गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे सादर केले आहे.

अपात्रता याचिकेचा निर्णय झाला नसल्याने पाटकर यांनी सिक्वेरांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, आलेक्स सिक्वेरा यांना रविवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. सिक्वेरा यांना वीज आणि उद्योग खाते मिळण्‍याची शक्‍यता आहे.

गेल्या वर्षी काँग्रेसमधून दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, रुडाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा हे आठ आमदार भाजपमध्ये सामिल झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com