Bicholim Shop Fire: डिचोलीत ‘फूड कॉर्नर’ मध्ये आग ; 30 हजारांचे नुकसान

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करुन मदतकार्य केल्याने मोठी दुर्घटना टळली.
Bicholim News
Bicholim News Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Shop Fire: डिचोली डिचोलीतील नवीन मार्केट संकुलामधील ‘फूड कॉर्नर’मध्ये आज (मंगळवारी) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली.

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करुन मदतकार्य केल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ३० हजारांहून अधिक रुपयांची हानी झाली. तर सुमारे ५० हजारांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

ही घटना घडली, त्यावेळी फूड कॉर्नर बंद होते. विशेष म्हणजे घटनेवेळी दुकानात भरलेला गॅस सिलिंडर होता. सिलिंडरने पेट घेतला असता, तर मात्र मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती.

शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. फूड कॉर्नरचे मालक दाऊल शेख यांनीही या माहितीस दुजोरा दिला.

शेजारील दुकानांवरील धोकाही टळला. अग्निशमन दलाचे उपअधिकारी भारत गावस यांच्या नेतृत्वाखाली गीतेश नाईक, रामचंद्र एकावडे, गौरीश गावस आणि सागर कुंकळकर या दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.

Bicholim News
Goa Accident: नावेली येथे दुचाकी अपघातात खारेबांद येथील युवक ठार

रेफ्रिजरेटरने घेतला पेट

बंद दुकानातून धूर येत असल्याची माहिती तेथील दुकानदाराने दाऊल शेख यांना दिली. त्याने लागलीच दुकानाकडे धाव घेवून अग्निशमन दलाला कल्पना दिली. दुकानातील रेफ्रिजरेटर तसेच वीज जोडणीचे बोर्ड जळून खाक झाले होते.

फ्रिजच्या दुसऱ्या बाजूने गॅसने भरलेला सिलिंडर होता. मात्र वेळीच आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com