Dengue Awareness : बार्देश तालुक्यात डेंग्यू, मलेरियाबाबत जागृती

Dengue Awareness : हा फैलाव यंदा होऊ नये, यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हापसा आरोग्य केंद्र, शिवोली आरोग्य केंद्रातर्फे जागृती केली जाते, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी दिली.
 Dengue Cases
Dengue CasesDainik Gomantak

Dengue Awareness :

बार्देश तालुक्यातील म्हापसा, थिवी, हळदोणा, कळंगुट, शिवोली, साळगाव, पर्वरी या सातही मतदार संघातील विविध भागात दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणांमधून मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरियाचा फैलाव होतो.

हा फैलाव यंदा होऊ नये, यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हापसा आरोग्य केंद्र, शिवोली आरोग्य केंद्रातर्फे जागृती केली जाते, ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, मे महिन्याच्या सुरुवातीपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी डासांपासून होणाऱ्या रोगांची माहिती देत आहेत. प्रत्येक गावात आयुष्यमान आरोग्य मंदिर पथक तयार केले आहे, घरोघरी जाऊन पाणी साठवण्याच्या जागा, प्लॅस्टिक डबे, करवंटी अशा डास उत्पत्तीच्या ठिकाणाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 Dengue Cases
South Goa: धेंपेंच्या पराभवासाठी ब्रह्मेशानंद स्वामी जबाबदार? तानावडेंचा काँग्रेसकडून निषेध, माफी मागण्याची मागणी

बांधकाम ज्या ज्या ठिकाणी होते, त्या त्या ठिकाणच्या कंत्राटदारांना कामगारांची रक्त चाचणी करणे, त्यांच्या वास्तव्याची माहिती पोलिसांना देणे, याविषयी सूचना केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com