Bicholim News : विद्यावर्धक मंडळातर्फे यंदापासून डिचोलीत ‘डे केअर सेंटर’ सुरू करणार

Bicholim News : चार ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना या केंद्रात दाखल करून घेण्यात येणार आहेत. शांतादुर्गा विद्यालयात शिकणाऱ्या मुलांसह अन्य शिशुवाटिका आणि प्राथमिक शाळांनी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रात प्रवेश घेण्याची मुभा असणार आहे.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, येथील विद्यावर्धक मंडळातर्फे यंदापासून डिचोलीत ''डे केअर सेंटर'' सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला असून, या निर्णयाचे अनेक पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून हे सेंटर सुरू करण्यात येणार असून, या केंद्रात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर यंदा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रमानिशी साजरे करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी विद्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी मंडळाचे सचिव अभिजित तेली, उच्च स्टेट्रजी विद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, संचालक अरुण साळकर, प्राचार्य रामा पाटकर उपस्थित होते.

चार ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना या केंद्रात दाखल करून घेण्यात येणार आहेत. शांतादुर्गा विद्यालयात शिकणाऱ्या मुलांसह अन्य शिशुवाटिका आणि प्राथमिक शाळांनी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रात प्रवेश घेण्याची मुभा असणार आहे.

या ''डे केअर सेंटर''मध्ये दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुलांची देखभाल करतानाच त्यांच्यासाठी खेळ आदी संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपली मुले कशी खेळतात-बागडतात ते पालकांना घरबसल्या मोबाईलवरुन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती विजय सरदेसाई यांनी दिली.

Bicholim
South Goa: दक्षिणेत ख्रिश्चन पाद्रींमुळेच पल्लवी धेंपेंचा पराभव, भाजप नेत्यांचा दावा; विरोधात मतदानाचा होता आरोप

सुवर्णमहोत्सवी वर्ष

विद्यावर्धक मंडळातर्फे डिचोलीत उच्च माध्यमिक विद्यालय सुरु केल्यास यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदाचे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. वर्षभर माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com