Music Festival : दवर्लीत नंदादीप संगीत महोत्सव

music festivals : महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ गायक तथा गुरू पं. रामराव नायक यांच्या हस्ते करण्यात आले.
Music Festival
Music Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

Music Festival : पणजी, स्वरसमर्थ गोमंतक आणि स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान ट्रस्ट दवर्ली यांच्यातर्फे कला संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने अखंड २४ तासांचा नंदादीप संगीत महोत्सव दवर्ली-मडगाव येथे स्वामी समर्थ देवस्थानात शनिवारी पार पडला.

बुजुर्ग तबलागुरू स्व. पं. प्रभाकर च्यारी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव या ठिकाणी गेली चार वर्षे आयोजित केला जात आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ गायक तथा गुरू पं. रामराव नायक यांच्या हस्ते करण्यात आले.

गुरुवर्य पं. प्रभाकर च्यारी यांचे ज्येष्ठ शिष्य कुमार सरज्योतिषी हे सन्माननीय पाहुणे म्हणून तर गुरुमाता अरुणा प्र. च्यारी व स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष जयेश नाईक हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Music Festival
Goa News: DYSP जिवबा दळवी आणि फॉरेन्सिक टीमकडून फाय पिलर चर्चचा तपास | Gomantak Tv

दिंडीने महोत्सवाला प्रारंभ झाला. उद्‌घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. शिल्पा डुबळे यांचे गायन, लक्ष्मीकांत खांडेकर यांचे सतारवादन, सिद्धी सुर्लकर यांचे गायन, अर्पिता शिरोडकर यांचे कथ्यक नृत्य, रामचंद्र नाईक व सावळो चोडणकर यांचे गायन व वास्तव रिवणकर यांचे तबलावादन रंगले.

दुसऱ्या सत्रात ओमकार च्यारी यांचे गायन, डॉ. राजेश भटकुर्से, अमित भोसले, भार्गव भटकुर्से, अमर मोपकर व गीतेश मांद्रेकर यांचे तबलासहवादन, नीलेश शिंदे, प्रथमेश पांढरे व किरण रायकर यांचे गायन झाले. तिसऱ्या सत्रात सुभाष परवार, समिक्षा काकोडकर, बाळकृष्ण मराठे व अदिती पाटील यांचे गायन व नीरज भोसले आणि सिद्धेश सावंत यांचे तबलासहवादन झाले.

सिद्धकला नृत्य संस्थेचे भरतनाट्यम

समारोपाचच्या सत्रात दुपारी जान्हवी बोंद्रे संचलित सिद्धकला नृत्य संस्थेचे भरतनाट्यम, हर्षा गणपुले, सूरज सहकारी, विदेश बाणावलीकर यांचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, डॉ. चेतनमूर्ती यांचे मृदंगवादन व रुपेश गावस यांचे गायन रंगले. शेवटी नीलेश शिंदे यांनी भैरवी म्हटली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com