Panaji News : शिक्षण, रोजगार, बेकारी भत्ता देण्यात ‘डबल इंजिन’ अपयशी; ‘इंडिया आघाडी’चे भाजपवर टीकास्त्र

Panaji News : काँग्रेसने ‘इंडिया आघाडी’चे सरकार स्थापन झाल्यावर ३० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे वचन दिले आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, केंद्र आणि राज्यात असणारे भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार शिक्षण व्यवस्थेतील सुविधा, युवकांना रोजगार आणि त्याचबरोबर बेरोजगारांना जाहीर केलेला बेकारी भत्ता देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ‘इंडिया आघाडी’च्या प्रवक्त्यांनी शनिवारी केला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मीडिया विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर, आम आदमी पक्षाचे नेते रामराव वाघ आणि शिवसेनेचे नेते जितेश कामत यांची उपस्थिती होती. पणजीकर म्हणाले, भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार हाच एक जुमला आहे.

केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने ‘इंडिया आघाडी’चे सरकार स्थापन झाल्यावर ३० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे वचन दिले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने युवकांना बेकारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु १२ वर्षांपासून तो भत्ता दिला गेला नाही.

सरकारकडून शिक्षणाचे भगवेकरण

रामराव वाघ म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात सुविधा देण्यात शासन अपयशी ठरले आहे. या सरकारने शिष्यवृत्ती बंद केली आहे आणि सरकारी शाळांमध्ये सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे.

भाजपने काँग्रेसच्या राजवटीच्या तुलनेत शैक्षणिक क्षेत्रातील अर्थसंकल्प कमी केला आहे, यावरून या सरकारचा दृष्टिकोन काय आहे, हे दिसून येते. भाजपने शिक्षणाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Panaji
Goa Crime News: व्हिडिओ कॉलवर बोलण्यास पत्नीचा नकार, उत्तर प्रदेशच्या युवकाने गोव्यात उचलले टोकाचे पाऊल

सत्ताधाऱ्यांना बेरोजगारी मान्य

जितेश कामत म्हणाले की, भाजप शिक्षणात आणि नोकऱ्या निर्माण करण्यातही अपयशी ठरला आहे. भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी राज्यात बेरोजगारी असल्याचे मान्य केले असल्याने आम्ही वेगळे काही सांगायची गरजच नाही, असे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com