Mandrem News : मांद्रेतील रस्ते, जमिनी, डोंगर, किनारपट्टीचे संवर्धन करा

Mandrem News : स्वराज्य संस्था: सरपंच नाईक यांना निवेदन सादर
Mandrem
MandremDainik Gomantak

Mandrem News :

हरमल, मांद्रे गावच्या सर्वांगीण विकासात येथील रस्ते, जमिनी, डोंगर तसेच किनारपट्टीचे जतन व संवर्धन आवश्‍यक असून भावीपिढीला मांद्रे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी या भागातील समविचारी नागरिक एकत्र येऊन स्वराज्य संस्थेची स्थापना केली आहे.

या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सरपंच प्रशांत नाईक यांची भेट घेउन विकासाचे मुद्दे व हरकती याबाबतचे एक निवेदन सादर केले.

स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पार्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत ऊर्फ बाळा नाईक या धडाडीच्या कार्यकर्त्यांची मांद्रेच्या सरपंचपदी निवड झाली आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सरपंच नाईक यांनी आता आपल्या कृतीतून गावाचा विकास करून दाखवावा. आजवर कित्येकांनी आश्वासने दिली व विरून गेली, मात्र नाईक आश्वासनांचा विसर होऊ न देता गावाचा विकास करतील, असा विश्‍वास स्वराज्य संस्थेला वाटतो, असे ते म्हणाले.

गावातील दोन देवस्थानानजिक सर्व्हे ३६५/१ व २७३/२ मधील बेकायदा बांधकामे त्वरित बंद करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मान्सूनपूर्व कामे, पाणी पुरवठा, स्मशानभूमी, ग्रामविकास समितीच्या बैठक, सायलेंट झोन आदी विकासात्मक मुद्दे व हरकती या निवेदनातून केल्या आहेत.

Mandrem
Goa News : मासोर्डेत गव्यांचा उपद्रव,भाजी मळ्याची नासधूस; स्थानिकांत भीती

चोपडे ते मांद्रे, मांद्रे ते मोरजी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून या विरोधात कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

मांद्रेतील पार्किंगची समस्या, फुटपाथ तसेच पारंपरिक पायवाटांवर झालेले अतिक्रमण यासंदर्भात आमदार जीत आरोलकर यांची भेट घेउन लक्ष वेधणार असल्याचे यावेळी माजी सरपंच विश्वनाथ शिरोडकर यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे ॲड प्रसाद शहापूरकर, शंकर गोवेकर, तुषार गोवेकर, संदेश सावंत, अग्नेलो फर्नांडिस आदी उपस्थित होते.

ग्रामसभेत सहभागी व्हावे : सरपंच

सरपंच प्रशांत नाईक यांनी स्वराज्य संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या संस्थेकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील प्रश्‍न समस्या सोडवण्यासाठी ग्रामसभा हे मुख्य व्यासपीठ आहे.

त्यामुळे स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसभेत सहभागी होऊन गावातील प्रश्‍न समस्या सोडवण्यास पंचायत मंडळास सहकार्य करावे. संस्थेने दिलेले निवेदनावर पंचायत मंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. बेकायदा गोष्टीविरुध्द पंचायत निश्‍चित कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com