Goa News : मासोर्डेत गव्यांचा उपद्रव,भाजी मळ्याची नासधूस; स्थानिकांत भीती

Goa News : घरासाठी हे पीक घेतले होते. शहराजवळ असलेल्या मासोर्डे गावात घरापर्यंत गवे आल्याने लोकांनाही धोका वाढलेला आहे. त्यामुळे गावस यांच्या तोंडचा घास गव्यांमुळे हिरावला असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

वाळपई पालिका क्षेत्रातील मासोर्डे गावात काल सोमवारी रात्री रानटी गव्यांनी भाजी पिकाची अक्षरश: नासधूस केली.

मासोर्डे येथील सुगडो गावस यांनी आपल्या जागेत मिरची, वाली, भेंडी, चिटकी, टोमेटो, लालभाजी आदी भाजीपाला लागवड केली होती. पीक बहरलेले होते. पण काल रात्री अगदी घराजवळच १०.३० च्या सुमारास तीन गव्यांच्या कळपाने गावस यांच्या भाजी पिकात आक्रमण करून भाजीची नासधूस केली.

Goa
Goa BJP: राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा तानावडे यांच्याकडून निषेध

घरासाठी हे पीक घेतले होते. शहराजवळ असलेल्या मासोर्डे गावात घरापर्यंत गवे आल्याने लोकांनाही धोका वाढलेला आहे. त्यामुळे गावस यांच्या तोंडचा घास गव्यांमुळे हिरावला असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

घरासाठी या भाजी पिकाचे उत्पादन घेतले होते. वन्य जीवांमुळे उत्पन्न हाती लागेनासे झाले आहे. सुगडो गावस म्हणाले गव्यांच्या उपद्रवामुळे लोक हैराण झालेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com