Goa Crime: सुमारे ५७ मीटर लांबीची भिंत पाडली; पोलिसांत गुन्हा नोंद
Goa Crime NewsDainik Gomantak

Curtorim News: दुसऱ्याच्या जमिनीत घुसून भिंत पाडली; २ लाख रुपयांची हानी केल्याची तक्रार

Goa Crime: सुमारे ५७ मीटर लांबीची भिंत पाडली; पोलिसांत गुन्हा नोंद
Published on

बाकभाट-राय येथे बेकायदेशीरीत्या दुसऱ्याच्या जमिनीत घुसून भिंत पाडून सुमारे २ लाख रुपयांची हानी केल्याची तक्रार मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. ही घटना २२ जून २०२४ घडली, असे पोलिस तक्रारीत म्हटलेले आहे.

बाकभाट-राय येथील काही संशयित संगनमत करून तक्रारदार ऑस्कर आब्रे यांच्या मालमत्तेत घुसले आणि चिऱ्यांनी बांधलेली सुमारे ५७ मीटर लांबीची भिंत पाडली. संशयितांच्या या कृत्यामुळे तक्रारदाराला सुमारे २ लाख रुपयांची हानी झाल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com