Goa Crime: मडगाव माजी उपनगराध्‍यक्षांच्‍या पतीविरुद्ध मारहाणीचा प्रयत्‍न केल्‍याची तक्रार; सावळ यांच्याकडून आरोपांचे खंडन

Margao: कालकोंडा येथे वॉकिंग ट्रॅकचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन ठेवण्‍यात आले हाेते त्‍यावेळी हा प्रकार घडला
Margao: कालकोंडा येथे वॉकिंग ट्रॅकचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन ठेवण्‍यात आले हाेते त्‍यावेळी हा प्रकार घडला
Complaint Canva
Published on
Updated on

Margao Crime

मडगाव: मडगावच्‍या माजी उपनगराध्‍यक्ष दीपाली सावळ यांचे पती दिगंबर सावळ यांनी आपल्‍याला शिवीगाळ करून आपल्‍यावर दगडफेक करण्‍याचा प्रयत्‍न केला अशा आशयाची तक्रार कालकोंडा - मडगाव येथील आंतोनियो परेरा यांनी मडगाव पोलिस स्‍थानकात दिली आहे. दरम्यान, या तक्रारदाराला आपण ओळखतसुद्धा नाही, त्‍यानेच आपल्‍यावर नको असलेले आरोप केले, असा खुलासा सावळ यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी माजी उपनगराध्‍यक्ष दीपाली सावळ यांचा वाढदिवस हाेता. त्‍याच दिवशी कालकोंडा येथे ३५ लाख रुपये खर्चून बांधण्‍यात येणाऱ्या वॉकिंग ट्रॅकच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन ठेवण्‍यात आले हाेते. त्‍यावेळी हा प्रकार घडला.

परेरा यांच्‍या दाव्‍याप्रमाणे आपल्‍या मालकीच्‍या शेतात बेकायदेशीररित्‍या भराव घालून आपल्‍या जागेवर अतिक्रमण केले जात असल्‍याने आपण दिगंबर कामत यांना जाब विचारण्‍यासाठी आलो असता, सावळ आपल्‍या अंगावर आला. तिथे असलेला एक दगड उचलून त्‍याने आपल्‍यावर मारण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, इतरांनी त्‍याला वेगळे केल्‍याने पुढचा अनर्थ टळला, असे सांगितले.

Margao: कालकोंडा येथे वॉकिंग ट्रॅकचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन ठेवण्‍यात आले हाेते त्‍यावेळी हा प्रकार घडला
Maragao WiFi Scam: नगराध्यक्ष आणि माजी मुख्याधिकारी यांचे एकमेकावर आरोप; वायफाय बिलाचे गूढ कायम

यासंबंधीचा एक व्‍हिडिओ सध्‍या व्‍हायरल झाला असून सावळ हे जमिनीवरील दगड उचलून कुणाच्‍या तरी अंगावर धावून जात असल्‍याचे त्‍यात दिसत आहे. या संबंधात सावळ यांना विचारले असता, ज्‍या जागेत हा वॉकिंग ट्रॅक बांधला आहे. तो सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या रस्‍त्‍याला जोडून आहे. तो कुणाच्‍याही शेतातून जात नाही.

याच रस्‍त्‍याच्‍या बाजूला स्‍थानिक युवक फुटबॉल खेळतात. या युवकांना खेळण्‍यापासून कुणी अडवू नये असे मी सांगण्‍याचा प्रयत्‍न केला असता काही जणांनी आपल्‍यावर आरोप करून हुसकावून लावण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातून हा प्रकार घडला, असे सावळ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com