CM Pramod Sawant : विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रशिक्षणही हवेच!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत ः तारमाथा-सुर्ल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

शिक्षण घेतल्यावर आपल्या भविष्याचा वेध घेत चांगली नोकरी तसेच व्यवसायात आपला ठसा उमटवण्यासाठी शिक्षणाबरोबरच प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील कलागुणांचा विकास प्रशिक्षण घेऊन आणखीन मजबूत केल्यास आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगले नाव कमवू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तारामाथा सुर्ल येथे केले.

तारमाथा-सुर्ल येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक दहावीचा विद्यार्थी गौरव सोहळा कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. व्यासपीठावर सरपंच विश्रांती सुर्लकर, मुख्याध्यापक सर्वेश्वर नाईक, शिक्षण अधिकारी लीना कळंगुटकर, आदित्य फडते, पा. शि. संघ अध्यक्ष तुळशीदास फोंडेकर, कृष्णा नाईक यांची उपस्थिती होती. शाळकरी मुलांनी स्वागतगीत सादर केले.

CM Pramod Sawant
Ponda: फोंड्यात भिंत कोसळून कार आणि दुचाकींचे नुकसान; गॅस पाईपलाईनही तुटली

तानीया उसगावकर, शृष्ठी प्रमोद नार्वेकर, कल्पेश मुळगावकर व योगिता च्यारी यांचा खास सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार आपटे, यांनी तर निनोश्का आल्बुकर्क यांनी आभार मानले.युवकांना भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकारने विविध दालने उपलब्ध केली आहेत, असेही सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant
Ponda News : नवीन युवा कलाकार घडवणे हीच शिकांत नागेशकरांना श्रद्धांजली

विद्यार्थ्यांचा गौरव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रणाली बांदेकर, प्रजोती पीळयेकर, मयुरेश सुर्लकर, पीयूष नार्वेकर, राजवी सोननाईक, प्रदनेश सुर्लकर, कृष्णा गावडे, अभिनव कळंबकर, अविष मडकईकर, राजाराम फोंडेकर, आमिष मडकईकर, यश खोडगीणकर, भुवनेश उजगावकर, रूद्रश वाघूर्मेकर, वरूण फोंडेकर या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा विद्यालयातर्फे स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com