Margao News : मडगावातील गटारांची साफसफाई; पहिली फेरी पूर्ण

Margao News : मुख्याधिकाऱ्यांची माहिती : मान्‍सूनपूर्व कामांना वेग; दुसऱ्या फेरीला लवकरच करणार सुरूवात
Margao
MargaoDainik Gomantak

Margao News :

सासष्टी, मडगाव नगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेली पावसाळापूर्व कामांची पहिली फेरी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी या प्रतिनिधीला दिली.

या फेरीत सर्व पंचवीसही प्रभागांमधील गटारे स्वच्छ करण्यात आली असून काही ठिकाणी गटारांची डागडुजी करण्यात आली आहे.

दुसऱ्या फेरीत कचरा, पालापाचोळा काढून परिसर स्वच्छ करण्यात येईल. काही प्रभागांमध्ये हे काम सुरू झाले आहे. तर तिसऱ्या फेरीत रस्त्यावर ज्या झाडांच्या फांद्या येतात त्या कापल्या जातील. त्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. पुढील काही दिवसांत आपत्कालीन समितीची बैठक होऊन त्यात या सर्व विषयांवर चर्चा होईल. सध्या कुठली झाडे कापायची व कुठली छाटायची याबद्दल सर्वेक्षण व माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

Margao
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

ही कामे एव्हाना पूर्ण झाली असती; पण लोकसभा निवडणुकीत काही कर्मचाऱ्यांना व मजुरांनाही निवडणूक कामासाठी नियुक्त केल्याने हे काम बाकी राहिले; पण पुढील १५ ते २० दिवसांत ही कामे पूर्ण केली जातील, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

मडगाव पालिका इमारत छपरावर प्लास्टिक आच्छादन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. इमारतीच्या संपूर्ण नूतनीकरण कामाचा प्रस्ताव जीएसआयडीसीकडे आहे. ही वारसा इमारत असल्याने तिच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतात, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण :

पाजीफोंड येथील प्रभाग ११ चे नगरसेवक राजू नाईक यांनीही पावसाळापूर्व कामांतर्गत गटारे स्वच्छ करण्यात आली. या प्रभागात जे मोठे नाले आहेत तेही स्वच्छ करण्यात येतील. गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात नाल्यांतून सुरळीतपणे पाणी वाहते. आपल्यालाही सहा दिवसांसाठी १० कामगार दिले होते व ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण केली.

मार्चमध्येच कामांना प्रारंभ

खारेबांद येथील प्रभाग १५चे नगरसेवक महेश आमोणकर याने सांगितले की, आपल्या प्रभागातील पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली आहेत. आपण ही कामे मार्च महिन्यातच सुरू केली होती. नगरपालिकेने आम्हाला सहा दिवसांसाठी १० कामगार दिले होते. जी काही छोटी-छोटी कामे बाकी आहेत ती नगराध्यक्षांशी चर्चा करून पूर्ण करण्यात येतील.

जीएसआयडीसीने इमारतीच्या नूतनीकरणासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात निविदा काढण्यात आली होती व प्रतिसाद न मिळाल्याने परत एकदा निविदा काढण्यात आली. सल्लागार नियुक्तीनंतर तो नूतनीकरणाचा आराखडा तयार करणार आहोत.

- गौरीश शंखवाळकर, मुख्याधिकारी, मडगाव पालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com