PM मोदीही सेंट झेवियरला 'गोयचो सायब' मानतात, वेलिंगकर बापलेकाने धार्मिक द्वेष पसरविणे बंद करावे - चर्चिल

आलेमाव यांनी सेंट झेवियरांचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी मडगाव येथे झालेल्या सभेत गोयचो सायब असा केल्याने आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Churchill Alemao
Churchill AlemaoDainik Gomantak

Churchill Alemao

गोव्यातील तमाम भाविकांच्या भावना ज्या संताकडे जुळल्या आहेत तो सेंट फ्रान्सिस झेवियर हा 'गोयचो सायब' असल्याचे खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे, त्यामुळे आता तरी वेलिंगकर पिता पुत्राने गोव्यात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम बंद करावे असे आवाहन बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केले.

आज वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी सेंट झेवियरांचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी मडगाव येथे झालेल्या सभेत गोयचो सायब असा केल्याने आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन केले. गोव्यात असलेल्या धार्मिक सलोख्याचाही प्रधानमंत्र्यानी गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

या पार्शवभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना, माजी संघचालक सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे पूत्र शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावर टीका करताना,आता तरी वेलिंगकर पिता पुत्राचे डोळे उघडावेत. दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करण्याचें त्यांनी बंद करावे असे आवाहन केले.

सेंट झेवियरप्रती कित्येक गोमंतकीयांच्या धार्मिक भावना गुंतलेल्या आहेत. गोवेकरानीच त्यांना गोयचो सायब ही पदवी दिली आहे. मात्र वेलिंगकर हे सेंट झेवियरना गोयचो सायब म्हणू नका असे आवाहन करतात. गोवेकरानी वेलिंगकर याना गोयचो सयब म्हणावे असे त्यांना वाटते का? असा सवाल आलेमाव यांनी केला.

पोर्तुगीज पासपोर्टमुळे कित्येक गोवेकरांचे भारतीय नागरिकत्व गेले आहे त्याबद्दल बोलताना आलेमाव म्हणाले, पोर्तुगीज पासपोर्टवर दक्षिण गोव्यातील ८० टक्के लोक समाधानी आहेत. त्यांनी पोर्तुगीज पासपोर्ट स्वतःला चांगला रोजगार मिळावा यासाठी घेतला आहे, पोर्तुगालात जाऊन स्थायिक व्हायला किंवा तिथे जाऊन मतदान करण्यासाठीं नव्हे. पोर्तुगीज पासपोर्टमुळे कुणाचे पोट भरतं असेल तर त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करणे योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया आलेमाव यांनी व्यकत केली.

मतयंत्राद्वारे केले जाणारे मतदान बंद करावे अशी मागणी घेऊन काही काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर भाष्य करताना आलेमाव म्हणाले, २०१२ मध्ये मी जेंव्हा या मतदान पद्धतीवर शंका घेतली होती त्यावेळीं ह्याच काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी मला वेड्यात काढले होते. तेव्हा जर ही पद्धती बरी होती तर त्या पद्धतीला आता विरोध का असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com