मडगाव रेल्वे स्थानकात होणार 'चार्जिंग स्टेशन', पार्किंगची जागा निश्चित 

अनेक प्रवाशांच्या गाड्यांसाठी हे चार्जिंग स्टेशन महत्वाचे ठरणार आहे.
 चार्जिंग स्टेशन
चार्जिंग स्टेशनDainik Gomantak

मडगाव (Margaon) येथील कोकण रेल्वे स्थानकाच्या (Kokan Railway Station) गाड्या पार्किंग करण्यात येत असलेल्या जागेवर विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारले जाणार आहे. यासाठी कोकण रेल्वे महामंडळाकडून निविदा मागविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेचे जनसपंर्क अधिकारी बबन घाटगे (Baban Ghatge) यांनी सांगितले.

 चार्जिंग स्टेशन
1979 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधा उभारणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) विविध योजना राबवल्या जात आहेत. पण, वाहन खरेदी करताना शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन आहे का, याचाही ग्राहक विचार करताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारचा ग्राहक (Electric Bike And Car) मोठ्या संख्येने वाढत आहे. त्याच दृष्टिकोनातून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

कोकण रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशी येत असतात. त्यांच्या गाड्यांसाठी हे चार्जिंग स्टेशन महत्वाचे ठरणार आहे. पर्यावरण संरक्षण आणि वाढते प्रदुषण याचा विचार करून अनेकजण इलेक्ट्रिक अनेकजण इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा या वाहनांचा असणार असल्याने हे स्टेशन उभारणीला कोकण रेल्वे महामंडळाकडून (Kokan Railway Board) प्राधान्य देण्यात आले आहे. अशी माहिती बबन घाटगे यांनी दिली.

 चार्जिंग स्टेशन
OBC Reservation : पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com