बेताळ देवाची गड्यांची जत्रा उत्साहात साजरी

भाविकांची गर्दी : रंगावलीने सांगता
gade jatra
gade jatraDainik Gomantak

काणकोण: महालवाडा-पैंगीण येथील बेताळ देवालयाची दर तीन वर्षांनी होणारी प्रसिद्ध गड्यांची जत्रा आज (21 रोजी) शेकडो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

सुमारे 45 फूट लाकडी खांबावर अवसर आलेल्या तलवारधारी गड्यांनी बांधून रहाट गरागरा फिरवण्यात येतो.

(Celebrate the fair of Gada with enthusiasm)

gade jatra
पेट्रोलचे कर कमी करता येतात तर...?

त्यावेळी महाल गडाखाली असलेल्या त्रिग्रामातील रहिवाशांना लोलयेकर आयले, पैंगीणकार आयले व खरेगाळकार आयलो, अशी विचारणा करतो. होकार मिळाल्यानंतर तो पुन्हा विचारतो, खुशी झाली का? हो असे उत्तर मिळाल्यानंतर गड्यांना रहाटापासून मुक्त करून खाली उतरवण्यात येते. रहाटाला बांधण्यापूर्वी त्यांना देवालयाच्या विहिरीवर स्नान घालून पारंपरिक पेहरावाने सजवण्यात येते. यावेळी बेताळाचा अवसर आलेल्या पुजाऱ्यासह लवाजमा विहिरीकडून बेताळ देवाच्या प्राकारात आणला जातो.

gade jatra
बोरी पूल, वाहनचालकांसाठी ठरतोय 'मृत्यूचा सापळा'

त्या ठिकाणी गडे व शैलचे गडे यांच्या पाठीत सुया व गरे टोचण्यात येतात. यंदा सर्व भाविकांच्या सहकार्याने गड्यांची जत्रा यथासांग पार पडल्याचे परशुराम पंचैग्राम देवालय समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर यांनी सांगितले.

30 मे रोजी बेताळ देवालयी रंगावली पूजेने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या काळात लोलये, पैंगीण व खरेगाळ या त्रिग्रामांत लग्न, मुंज व अन्य शुभकार्ये न करण्याची पूर्वापार प्रथा आहे. 28 रोजी बेताळ देवालयी शुद्धाचार, 29 रोजी देवालयी खीच; तर 30 रोजी रंगावली पूजेने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com