Calangute Shivaji Statue: कळंगुटमध्ये सरपंच, पंचायत सचिवांच्या गाड्या फोडल्या; कुणाला अटक केली तर... आंदोलकांचा इशारा

सरपंच गट-शिवप्रेमी गट आमनेसामने आल्याने तणाव वाढला; पोलिसांनी एका गटाला पिटाळले
Calangute Shivaji Statue Row
Calangute Shivaji Statue Row Dainik Gomantak

Calangute Shivaji Statue Row: कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून सुरू असलेल्या वाद चिघळत चालला आहे. दरम्यान, शिवप्रेमींचे आंदोलन सुरू असताना सायंकाळी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचा गटही आंदोलनस्थळी दाखल झाला.

दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. या वेळी शिवप्रेमी गटाकडून सिक्वेरा यांच्या समर्थकांवर किरकोळ दगडफेक आणि बाटल्या फेकल्याच्या घटना घडल्या. यात सरपंच सिक्वेरा आणि पंचायतीचे सचिव यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Calangute Shivaji Statue Row
Calangute Shivaji Statue: कळंगूटमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा वाद चिघळला; आंदोलकांचा पंचायतीत घुसण्याचा प्रयत्न

दरम्यान, एका जरी आंदोलकाला अटक केली तर सर्व आंदोलक मिळून जेल भरो आंदोलन करू, तसेच त्यानंतर काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

पोलिसांनी सरपंचांच्या गटाला तिथून पिटाळून लावले. त्यामुळे मोठा वाद टळला. दरम्यान, या वादाला हिंदू विरोधी कॅथलिक अशी किनार आहे. त्यात तेल ओतण्याचे काम होत असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Calangute Shivaji Statue Row
गोव्याच्या पाण्यावर महाराष्ट्राचा डोळा? 5 धरणांचं डीपीआर छाणणीसाठी सावंत सरकारकडे

सकाळी 11 पासून कळंगुट पंचायतीसमोर शिवप्रेमींची गर्दी जमली होती. तेव्हापासून आंदोलक सरपंचांनी पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, आंदोलकांनी पंचायतीत घुसण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची आणि आंदोलकांची मोठी झटापटही झाली.

दरम्यान, आंदोलक अजूनही सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी माफी मागावी, या मागणीवर ठाम आहेत. तर पंचायतीने पुतळा हटविण्याबाबतच्या निर्देशाला स्थगिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com