Self Accident : फोंडा येथील दाम्पत्याच्या कारला सांगेत अपघात

सुदैवाने अपघातात कुणी जखमी झाले नाही
Car Self Accident At Sanguem
Car Self Accident At SanguemDainik Gomantak

Car Self Accident At Sanguem : आज दुपारी सांगे येथे एका कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या स्वयंअपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने अपघातात कुणी जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान आज पहाटे करासवाडा, म्हापसा येथील उड्डाणपुलावर एका कारला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. यामध्ये कार पूर्ण जाळून खाक झाली.

Car Self Accident At Sanguem
Ajit Pawar Deputy CM : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

याबाबत अधिक माहिती अशी की, एका कारमधून फोंडा येथील दाम्पत्य प्रवास करीत होते. त्यांची कार दांडो, सांगे येथे दिवाणी न्यायालयाजवळ आली असता कार स्लीप होऊन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकली. या स्वयंअपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

मात्र, या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.

Car Self Accident At Sanguem
एकीकडे कारशेडवर तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध कोसळले झाड; राज्यात अग्निशमन दलाचे जवान ॲक्शन मोडमध्ये

म्हापसा येथे पहाटे झालेल्या अपघातात कोलवाळच्या दिशेने चाललेल्या कारला पुलावर असताना अचानक आग लागली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेत जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे तर तीस हजारांपर्यंतचे नुकसान वाचवण्यात यश आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com