Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

Calangute: जमिनीचे मालक आणि कूळ यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प; प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याची माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली
Calangute: जमिनीचे मालक आणि कूळ यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प; प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याची माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली
Calangute proposes bus stand and market complex Canva
Published on
Updated on

Calangute Market Complex And Bus Stand

म्हापसा: कळंगुटमध्ये बोडके वड परिसरात पंचायतीतर्फे टाटा ग्रुपच्या टाटा ट्रेन्स या कंपनीच्या साहाय्याने मार्केट कॉम्प्लेक्ससह बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. ग्रामस्थ तथा जमिनीचे मालक आणि कूळ यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असून या प्रकल्पासाठी सरकारी प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याची माहिती सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी दिली.

शुक्रवारी ग्रामपंचायत घरात आयोजित पत्रकार परिषदेत उपसरपंच गीता परब, पंचायत सचिव अर्जुन वेळीप तसेच आजी माजी पंच सदस्य उपस्थित होते. सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले की, कळंगुटमध्ये प्रशस्त मार्केट कॉम्पलेक्स आणि बस स्थानक व्हावे, हे आपले स्वप्न होते. आता २० वर्षांनी ते साकार होण्याच्या मार्गी आहे.

यासाठी आम्ही बोडके वड परिसरातील विद्यमान पेट्रोलपंप जवळील सर्व्हे क्रमांक ४६९/५ ते २९ मधील १६३०० चौरस मीटर आणि सर्वे क्रमांक ४७१/५ ते २२ मधील १८५०० चौरस मीटर अशी ३४ हजार ८०० चौ. मी. जमिन निश्चित केली आहे. या प्रकल्पासाठी परवानगी देत नगरनियोजन खात्याने जमिनीच्या झोनमध्ये आवश्यक बदल केला आहे, असे सिक्वेरा यांनी सांगितले.

Calangute: जमिनीचे मालक आणि कूळ यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प; प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळाल्याची माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली
Calangute: सूचनांकडे दुर्लेक्ष, सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्या हॉटेल्सना कळंगुट पंचायतीकडून तीन लाखांचा दंड

या प्रकल्पासाठी २००४मध्ये आर्किटेक्ट तुलिओ डिसोझा यांनी तयार केला होता. सरकारी खात्यांचा परवानाही मिळाला होता. मात्र काही अडचणी तसेच पैस्यांच्या समस्येमुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिला. आता टाटा ग्रुपच्या टाटा ट्रेन्स या कंपनीने हा प्रकल्प उभारण्याची सहमती दर्शविली असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन संयुक्त उपक्रमांतर्गत (जॉईंट व्हेंचर) प्रकल्प साकारण्याची ऑफर दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com