Calangute Dance Bar : कळंगुटच्या पंचाकडून 'डान्स बार'च्या कर्मचाऱ्याला मारहाण; कारण आले समोर

कळंगुट पंचायत सदस्यासह इतर काहींनी सोमवारी पहाटे किनारी गावातील एका ‘डान्स बार’मध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
Dance Bar Worker Assaulted
Dance Bar Worker Assaulted Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे पर्यटनाचे केंद्र असल्यामुळे इथे देश-परदेशातील पर्यटक मजामस्ती करण्यासाठी येत असतात. मुख्यत्वे समुद्रकिनाऱ्यांवरील डान्सबार हे पर्यटकांचे आकर्षण असते. मात्र याला स्थानिकांचा नेहमीच विरोध दिसून आलेला आहे. कळंगुट किनाऱ्यावरील एका डान्सबारमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Dance Bar Worker Assaulted
Yewale Amruttulya Tea: गोवेकरांनाही 'अमृततुल्य' मसालेदार चहाची भुरळ

कळंगुट पंचायत सदस्यासह इतर काहींनी सोमवारी पहाटे किनारी गावातील एका ‘डान्स बार’मध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. डान्सबारच्या विरोधात स्थानिक रहिवाशांच्या सततच्या निषेधाच्या मालिकेदरम्यान ही घटना घडली आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कथित डान्स बारचे व्यवस्थापक रविकांत यादव यांच्याकडून तक्रार मिळाली होती की, कळंगुट पंचायत सदस्य स्वप्नेश वायंगणकर, रोहित पालकर आणि सनी कांदोळकर या तिघांनी इतर अनोळखी व्यक्तींसह त्यांचा कामगार मोसेन याला त्याच्या घराबाहेर मारहाण केली.

सोमवारी पहाटे 1.10 च्या सुमारास खोबरा वाड्डो येथील रेस्टॉरंटमध्ये येऊन व्यवसाय सुरू ठेवल्यास त्यांना व यादव यांना जीवे मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली आहे. तसेच उपाहारगृहाच्या समोरील भागाचेही नुकसान केले.

आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेसंदर्भात पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com