Bicholim News : डिचोलीत भाजपचे वर्चस्व अबाधित : विक्रमी मताधिक्‍य

Bicholim News : लोकसभा निवडणुकीत मिळालेले हे विक्रमी मताधिक्‍य पाहता, डिचोली तालुक्यात भाजपचेच वर्चस्व अबाधित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
bjp
bjp Dainik Gomantak

तुकाराम सावंत

Bicholim News :

डिचोली, उत्तर गोव्यातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयात पुन्हा एकदा डिचोली तालुक्याने महत्वाचा वाटा उचलला आहे. यावेळी या तालुक्याने त्‍यांना विक्रमी मतांची आघाडी मिळवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेले हे विक्रमी मताधिक्‍य पाहता, डिचोली तालुक्यात भाजपचेच वर्चस्व अबाधित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

यावेळी डिचोली तालुक्यातील डिचोलीसह साखळी आणि मये या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मिळून भाजपला ३६ हजार २५० मतांची आघाडी मिळाली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजेच १५ हजार ७६४ मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या बाजूने तालुक्यात प्रतिस्पर्धी काँग्रेसची स्थिती नाजूक बनली असून, या पक्षावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

bjp
BJP To Introspect South Goa Defeat: दक्षिणेत पल्लवी धेंपेंचा पराभव का झाला? भाजप कारणांचा शोध घेणार

२००७ आणि २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर तालुक्यातील डिचोलीसह साखळी आणि मये मिळून तिन्ही मतदारसंघांत भाजपने आपला झेंडा फडकावण्यात यश मिळवले. तर २०१२ आणि २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त डिचोली मतदारसंघात भाजपची काहीशी पीछेहाट होताना अपक्ष उमेदवारांची सरशी झाली.

साखळी मतदारसंघ

साखळी हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या आघाडीवर झालेला परिणाम वगळता गेल्या सलग तीन विधानसभा निवडणुकांत या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्‌ट्रिक केली आहे.

तत्पूर्वीही या मतदारसंघातून दोनवेळा भाजपने विजय मिळवलेला आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला अल्प म्हणजे केवळ ६६६ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मताधिक्क्याकडे सर्वांची नजर लागून राहिली होती. मात्र राजकीय अंदाज फोल ठरले.

डिचोली मतदारसंघ

डिचोली मतदारसंघात आतापर्यंत तीन विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. २०२२ साली झालेल्या गत विधानसभा निवडणुकीत मात्र डिचोली मतदारसंघातून भाजपची पीछेहाट होताना, अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची सरशी झाली.

तरी देखील निवडून येताच डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीत जरी भाजप उमेदवाराचा पराभव झाला, तरी दुसऱ्या बाजूने अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे वर्चस्व टिकून राहिले. या लोकसभा निवडणुकीत अपक्ष आमदार डॉ. शेट्ये आणि भाजप कार्यकर्त्यांनी हातात हात घालून प्रचार केला होता.

मये मतदारसंघ :

मये मतदारसंघ हा भाजपचा ‘गड’ म्हणून ओळखण्यात येत आहे. १९८९ साली स्वतंत्र मये मतदारसंघाची रचना झाल्यापासून तेथे भाजपने पाचवेळा झेंडा फडकावला आहे. गेल्या सलग चार विधानसभा निवडणुकांत मिळून आतापर्यंत पाचवेळा या मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

२०१७ आणि २०२२ साली सत्ताधारी आमदारांना उमेदवारी डावलूनही भाजपच्या वर्चस्वावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. उलट हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. भाजपच्या मताधिक्‍यात कमालीची वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com