Belagavi - Vasco Train: बेळगाव - वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करा; भाजप खासदाराची मागणी

Belagavi - Vasco Intercity Express: बेळगावातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी गोव्यात येत असतात, यात रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
Belagavi - Vasco Train: बेळगाव - वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करा; भाजप राज्यसभा खासदाराची मागणी
Belagavi - Vasco Intercity ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Belagavi - Vasco Intercity Express

पणजी: बेळगाव ते वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करा, अशी मागणी भाजप खासदाराने केली आहे. यामुळे गोवा ते कर्नाटक राज्याचा संपर्क आणखी सुलभ होणार असल्याचा दावा भाजपचे राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी केला आहे.

राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कडाडी या आपल्या भाषणात बेळगाव ते वास्को इंटरसिटी एक्सप्रेसची मागणी करताना दिसत आहेत.

Belagavi - Vasco Train: बेळगाव - वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करा; भाजप राज्यसभा खासदाराची मागणी
Goa Cruise Terminal: गोव्यात होणार नवे क्रूझ टर्मिनल; ड्युटी फ्री शॉप, लाउंज, फूड कोर्ट सारख्या मिळणार सुविधा

दक्षिण गोव्याच्या सीमेला कर्नाटक राज्याची सीमा जोडली जाते. बेळगावातून मोठ्याप्रमाणावर प्रवासी गोव्यात येत असतात, यात रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान, गोवा आणि कर्नाटकला जोडणारी बेळगाव ते वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाल्यास त्याचा अनेकांना फायदा होईल, असा दावा कडाडी यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com