डिचोलीत तीन दुचाकींमध्ये विचित्र अपघात; 1 जखमी

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास जलस्रोत खात्याच्या इमारतीसमोर हा अपघात घडला.
Goa Accident News
Goa Accident NewsDainik Gomantak

डिचोली: डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील वाठादेव येथे तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक जखमी झाला. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास जलस्रोत खात्याच्या इमारतीसमोर हा अपघात घडला.

अपघातातील जखमीला उपचारासाठी डिचोली सामाजिक आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. अपघात नेमका कसा झाला, त्याची माहिती मिळू शकली नाही.

Goa Accident News
बोरीतील नदीत उडी घेत विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

मात्र समोरासमोर आणि बाजूने मुख्य रस्त्यावर आलेल्या दुचाकीमध्ये गोंधळ उडाल्याने हा अपघात घडल्याचे समजते. तिन्ही दुचाकी आणि स्वार रस्त्यावर पडले.अपघातस्थळी लोकांनी गर्दी केली होती. काहीवेळ मुख्य रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली. डिचोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच वाहतूक सुरळीत करण्‍यास मदत केली. अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com