Goa Crime: बिहारच्या मजुराचे राक्षसी कृत्य! गोव्यात चार वर्षीय युरोपियन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Goa Crime News: बिहारच्या मजुराने गोव्यात युरोपियन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Goa Crime: बिहारच्या मजुराचे राक्षसी कृत्य! गोव्यात चार वर्षीय युरोपियन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कामासाठी गोव्यात आलेल्या बिहारच्या मजुराने चार वर्षांच्या युरोपियन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणी २९ वर्षीय मजुराला अटक केली आहे. मंगळवारी (दि. १० सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संशयित मजुराच्या मुलीसोबत अंगणात खेळत होती. यावेळी संशयित मजुराने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

युरोपियन कुटुंबीय २०१६ पासून भारतात राहत आहेत. दोन महिन्यापूर्वी ते गोव्यात शिफ्ट झाले होते. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गोवा हदरला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com