Bicholim News : केळबाईच्‍या जत्रोत्सवाला प्रारंभ; मुळगाव भक्तिमय

Bicholim News : पाच दिवस कार्यक्रम; कौलोत्सवाने होणार सांगता
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, मुळगावची ग्रामदेवता श्री केळबाई देवीच्या जत्रोत्सवाला काल शनिवारी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला. येत्या बुधवार दि. १७ एप्रिलला कौलोत्सवाने या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेठरुपी श्री देवी केळबाई वर्षातून एकदा चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी शेकडो धोंड भक्तगणांसह मयेस्थित आपल्या बहिणीच्या भेटीला जाते. काल शनिवारी गावकरवाडा-मुळगाव येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक विधींसह या जत्रोत्सवाला सुरूवात झाली. दुपारी पवित्र तळीवर स्नान करून व्रतस्थ धोंड भक्तगण शुचिर्भूत झाले.

सायंकाळी अबोलीच्या फुलांनी देवीची पेठ परंपरेप्रमाणे सजविण्यात आली. मध्यरात्री गाऱ्हाणे झाल्यानंतर ढोलांच्या निनादात आणि देवीच्या जयघोषात शेकडो धोंड भक्तगणांसह देवीच्या पेठने मयेला जाण्यासाठी प्रस्थान केले. आज रविवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पेठचे मये गावात आगमन झाले. मुळगावहून पारंपरिक वाटेतून बोर्डे-डिचोलीमार्गे पेठ मयेला जाताना वाटेत व्हाळशी, बोर्डे आणि डिचोलीतील भाविकांनी देवीचे भक्तिभावाने स्वागत करून दर्शन घेतले.

Bicholim
Goa Flights: फक्त 1991 रुपयांत करा गोवा ते जळगाव विमान प्रवास ; Fly91 च्या नवीन उड्डाणांची घोषणा

बुधवारी कौलोत्सव

मये येथे गेलेली मुळगावची पेठ मंगळवारी मध्यरात्री मुळगाव गावात माघारी येण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. बुधवार दि. १७ एप्रिलला पहाटे या पेठचे मुळगाव येथे आगमन होणार आहे.

गावात मानाप्रमाणे कौल दिल्यानंतर देवीच्या मंदिराजवळ कौलोत्सव होऊन या उत्सवाची सांगता होईल. जत्रोत्सवानिमित्त यंदाही मुळगावात नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com