Bicholim News : ग्रीष्मातील राजा ‘गुलमोहोर’ बहरला; सौंदर्याची मुक्त उधळण

Bicholim News : असंतुलित हवामानामुळे यंदा गुलमोहोराच्या बहरावर परिणाम झाल्याचा अंदाज असून, गुलमोहोरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींची यंदा काहीशी उपेक्षा होण्याची शक्यता आहे.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, गुलमोहोर म्हणजे ग्रीष्म ऋतूचा राजा अशी ओळख आहे. एरव्ही ग्रीष्म ऋतूपूर्वी दुर्लक्षित राहणारा गुलमोहोर ज्यावेळी फुलांनी रसरसून बहरून आपल्यातील दडलेल्या खऱ्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करू लागतोय, त्यावेळी मात्र प्रत्येकाला हे झाड भुरळ घालते.

कवी मनासह प्रियकरांना तर हे झाड वेड लावल्याशिवाय राहत नाही. सौदर्याची देण असलेली गुलमोहोराची झाडे आता फुलू लागली असून, यंदा मात्र अजूनतरी गुलमोहोरांची झाडे अपेक्षेप्रमाणे रसरसून बहरल्याचे जाणवत नाही.

असंतुलित हवामानामुळे यंदा गुलमोहोराच्या बहरावर परिणाम झाल्याचा अंदाज असून, गुलमोहोरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींची यंदा काहीशी उपेक्षा होण्याची शक्यता आहे. ग्रीष्माचा राजा म्हणून ओळख असलेल्या आणि निसर्गाने सौदर्यांचे भरभरुन वरदान दिलेला गुलमोहोर रसरसून फुलतोय, त्यावेळी प्रत्येकाला या झाडाबद्दल कुतूहल निर्माण होते.

एरव्ही दुर्लक्षित असणारे गुलमोहोराचे झाड मात्र, ज्यावेळी पूर्णपणे लाल-केशरी फुलांनी बहरुन येते, त्यावेळी या झाडाचे सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित केल्यावाचून राहत नाही.

ग्रीष्मातला राजा असलेला ''गुलमोहोर'' सध्या आपल्या सौंदर्याचे खरे रुप प्रगट करू लागला आहे. फुलांची उधळण करीत ग्रीष्मातला हा राजा प्रत्येकाशी मुक्त संवाद साधत असतो. डिचोलीत सर्वत्र रस्त्याच्या बाजूने गुलमोहोराची झाडे असून, ही झाडे लाल-केशरी फुलांनी बहरु लागली असून, आपल्या नैसर्गिक सौंदर्याची उधळण करू लागली आहेत. सौंदर्याची उधळण करताना अजिबात कंजूषपणा न करणारी ही झाडे आपले खरे रुप दाखवू लागली आहेत.

Bicholim
Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

पाना, फुलांमध्‍ये औषधी गुणधर्म

ग्रीष्म ऋतूत सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करणारे गुलमोहोराचे झाड हे निरुपयोगी आणि कमकुवत. तरी गुलमोहोराची पाने आणि फुलांमध्ये औषधी गुणधर्म असून, आयुर्वेदात त्याला महत्व आहे. फुलेही अन्य फुलांप्रमाणे सुंगंधीत नसली, तरी निसर्गाने दिलेल्या या देणगीमुळे गुलमोहोराची फूले केवळ निसर्गप्रेमींनाच नव्हे, तर प्रत्येकाला आपल्या सौदर्यांचे वेड लावतात.

नैसर्गिक किमया; प्रत्‍येकाला आकर्षण

प्रत्येकाला गुलमोहोराच्या फुलांची भुरळ पडतानाच, मनमोहक फुलांविषयी साहजिकच कुतूहलही निर्माण होत असते. काहीजण तर या फुलांच्या प्रेमातही पडतात. या नैसर्गिक किमयेचा अनुभव सध्या डिचोलीत येऊ लागला आहे.

डिचोली-साखळी हमरस्त्यावरील गुलमोहोराची झाडे सध्या लाल-केशरी फुलांनी बहरू लागली असून, या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत. गुलमोहोराच्या प्रत्येक झाडाखाली लाल-केशरी फुलांचा सडा पसरत असल्याचे चित्र दिसून येत असते. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ही झाडे आकर्षित करीत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com