Bicholim News : लोकवस्तीतील धोकादायक झाडे हटवा; जिवाला धोका

Bicholim News : डिचोलीतील पिराची कोंड परिसरातील नागरिकांची मागणी
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, अवकाळी पावसाच्या तडाख्यात झाडे पडण्याच्या घटना वाढत असल्याने शहरातील पिराची कोंड येथील धोकादायक झाडांमुळे लोक भयभीत बनले आहेत. कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असलेली धोकादायक झाडे हटवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांत डिचोली तालुक्यातील वेगवेगळ्या भागात दहाहून अधिक घरांवर मिळून पस्तीसच्या आसपास झाडे कोसळली आहेत. या घटनांमुळे पिराची कोंड येथील लोकांची भीती वाढली आहे. पिराची कोंड येथे दहाहून अधिक जुनाट आणि कमकुवत झाडे घरांना टेकून आहेत.

Bicholim
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

पावसाच्या तडाख्यात एखादे झाड कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळीवाऱ्यासह पाऊस पडला की, आमच्यावर आकांत कोसळतोय. रात्रीच्या वेळी जाग आली की बऱ्याचदा जिवाच्या आकांताने आम्ही घराबाहेर धाव घेतोय, असे काही महिलांनी सांगितले.

जीव मुठीत घेउन आम्ही दिवस काढीत आहोत, असेही या महिलांनी सांगितले. गेल्या वर्षी पावसाळ्यात एकाच रात्री चार झाडे कोसळली होती. मात्र सुदैवाने कोणतीही आपत्ती ओढवली नव्हती.

अधिकाऱ्यांकडून पाहणी

गेल्या वर्षी १३ जूनला वन आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पिराची कोंड धोकादायक झाडांची पाहणी केली होती. काही झाडे धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले होते. मात्र ही झाडे हटविण्याच्या दृष्टीने आतापर्यंत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. परिणामी धोका वाढला आहे. एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी ही झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com