Bicholim Rain : डिचोलीला वादळी वाऱ्याचा फटका; घरांची हानी

Bicholim Rain : : झाडांची पडझड, वीज सेवा कोलमडली; लाखोंचे नुकसान
Bicholim Rain
Bicholim Rain Dainik Gomantak

Bicholim Rain :

डिचोली तालुक्‍यातील न्‍हावेलीसह पिळगाव, शिरगाव, कारापूर परिसराला गुरुवारी रात्री उशिरा वादळाचा जोरदार तडाखा बसला.

त्‍यात दहाहून अधिक घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी पत्रे उडाले; बऱ्याच बागायतींमध्‍ये झाडे मोडून पडली; तर धुळेर, गिरदोली, बोरी येथे घरांवर वीज पडून नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. अवकाळी पाऊस २६ मेपर्यंत लांबला असून, हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. डिचोलीला वादळी वाऱ्याचा फटका

आठ दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने काल रात्री कहर केला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने डिचोली तालुक्‍याला झोडपून काढले.

Bicholim Rain
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटात झालेल्‍या पावसाने रस्ते जलमय झाले. गटारातील माती रस्त्यांवर वाहून आली. ठिकठिकाणी झाडे पडून लाखोंचे नुकसान झाले. कातरवाडा-न्हावेली या भागात वेगवान वाऱ्यामुळे काही झाडे आडवी झाली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

मस्तेवाडा येथील दशरथ यशवंत नाईक यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर असलेले पत्र्याचे छप्पर संपूर्ण लोखंडी ट्यूब, चॅनल्स व पत्रे उडून गेले. ते शेजारीच असलेल्या कुळागराच्या पलिकडे म्हणजेच सुमारे २०० मीटर अंतरावर पडले. मस्तेवाडा येथील श्याम पांडुरंग नाईक घराशेजारी असलेल्या शेडवर निरफणसाचे झाड पडल्याने त्यांचे २० हजारांचे; तर कातरवाडा-न्हावेली येथील सत्यवती गाड यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. या व्‍यतिरिक्‍त अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला.

वादळामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या व वीजखांब मोडले. त्यामुळे न्हावेली गावातील बहुतेक भागांत गुरुवारी रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी दिवसभर वीज कर्मचाऱ्यांकडून पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

न्हावेलीचे सरपंच कालिदास गावस, स्थानिक पंचसदस्य नारायण गावस यांनी परिस्‍थितीची पाहणी केली. तलाठी वैष्णवी नाईक यांनी नुकसान झालेल्या घरांचा अहवाल तयार केला. कृषी अधिकाऱ्यांनी बागायतींमध्ये सर्वेक्षण केले.

तिसवाडीत पाणीबाणी; आजही मर्यादित पाणी

तिसवाडी तालुक्यातील विविध भागांत शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा न झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. अनेकांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या टँकरसाठी बुकिंग सुरू केली. दिवसभर लोकांचे टँकरसाठी फोन घेताना कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.

दरम्‍यान, उद्या (शनिवार) २५ रोजीही पणजीसह ताळगाव, सांताक्रुझ, सांत आंद्रे तसेच गोमेकॉ इस्पितळ परिसरात मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. ओपा पाणी प्रकल्पात अचानक वीज उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. तिसवाडीत पाणी सोडण्‍यात आले आहे; परंतु त्याचा वेग कमी असणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता थॉमस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com